वेगाने घोडदौडीसह स्वप्नवत साम्राज्यविस्तार साधणाऱ्या अदानी समूहाची चाल हिंडेनबर्ग रिसर्चच्या गैरव्यवहार आणि लबाड्यांचा आरोप करणाऱ्या अहवालानंतर पुरती मंदावली असून, अहवालापश्चात दोन महिन्यांत अदानी समूहाने विस्ताराच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजना गुंडाळल्या अथवा लांबणीवर टाकल्याचे दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अदानी समूहात गत कैक वर्षांपासून घोटाळे सुरू आहेत, असा आरोप करणारा अहवाल हिंडेनबर्ग रिसर्चने २४ जानेवारीला जाहीर केला होता. तेव्हापासून अदानी समूहातील कंपन्यांचे समभागांची भांडवली बाजारात पडझड सुरू असून, एकंदर १२५ अब्ज डॉलरच्या आसपास समूहाच्या बाजारमूल्याचे पतन झाले आहे. याचा परिणाम म्हणजे समूहाने नवीन क्षेत्रांमध्ये विस्ताराच्या आखलेल्या योजना एक तर पूर्णपणे गुंडाळल्या अथवा त्यांना लगाम घालून काम थांबविले असल्याची माहिती समूहातील अंतर्गत सूत्रांनी दिली.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Expansion ambitions of adani group halted due to result of hindenburg report asj
First published on: 31-03-2023 at 09:42 IST