नवी दिल्ली : एअर इंडिया समूहाच्या विमान ताफ्यात वाढ होऊन ते सध्या ३०० विमानांवर पोहोचले असून, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ३१२ मार्गांवर सेवेसह, आठवड्याला होणारी उड्डाणे ८,५०० वर जाणे अपेक्षित आहे.

टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियामध्ये ‘विस्तारा’चे विलीनीकरण मंगळवारी पूर्णत्वाला गेले आहे. एअर इंडियाकडे मोठ्या आकाराची ६७ विमाने असून, त्यातील सात ‘विस्तारा’ची आहेत. एअर इंडिया आणि विस्तारा एकत्रित आल्याने ही देशातील सर्वांत मोठी आंतरराष्ट्रीय उड्डाणे करणारी आणि देशांतर्गत दुसऱ्या क्रमांकाची प्रवासी विमान कंपनी बनली आहे. विलिनीकरणापूर्वी एअर इंडियाकडे एकूण २१० विमाने, ९१ ठिकाणे आणि १७४ मार्गांवर सेवा दिली जात असून, आठवड्याला ५,६०० विमानांची उड्डाणे सुरू आहेत.

Mumbai subway metro, subway metro passengers Mumbai , Mumbai metro,
भुयारी मेट्रोकडे मुंबईकरांची पाठ, दुसऱ्या महिन्यात प्रवासी संख्येत ६८ हजारांहून अधिकने घट
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
atal setu traffic declined
विश्लेषण : अटल सेतूकडे वाहनचालकांची पाठ? वाहनांची संख्या रोडावली का?
pod taxis , Shiv Railway Station, pod taxis Mumbai,
दुसर्‍या टप्प्यात पाॅड टॅक्सीची शीव रेल्वे स्थानकापर्यंत धाव, १६ स्थानकांचा समावेश
railway department instructed PCMC to demolish indira Gandhi Flyover
पिंपरी चिंचवड शहरातील पहिला उड्डाणपूल लवकरच इतिहासजमा?
nagpur airport latest marathi news
नागपूर : सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत विमानसेवा बंद, काय आहे कारण?
AAI Apprentice Recruitment 2024: Recruitment For 197 Posts
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये १९७ पदांसाठी भरती; कसा कराल अर्ज? जाणून घ्या
Airtel cheapest Plan
Airtel Affordable Plan : आता सतत रिचार्ज करण्याची गरज नाही, Airtel ने आणलाय धमाकेदार प्लॅन; भरपूर डेटा आणि OTT सबस्क्रिप्शन मिळेल फ्री

हेही वाचा >>> कारखानदारी क्षेत्राचे ऑगस्टमधील उणे स्थितीतून सकारात्मक वळण , सप्टेंबरमध्ये औद्योगिक उत्पादन दरात ३.१ टक्क्यांची वाढ

एअर इंडिया एक्स्प्रेसची मालकी टाटा समूहाकडे आहे. एअर इंडिया एक्स्प्रेसमध्ये एआयएक्स कनेक्टचे विलीनीकरण १ ऑक्टोबरला झाले. एअर इंडियाकडे ८० छोटी आणि ६० मोठी विमाने, विस्ताराकडे ६३ छोटी आणि ७ मोठी विमाने आहेत. याच वेळी एअर इंडिया एक्स्प्रेसकडे ९० छोटी विमाने आहेत. यामुळे एअर इंडियाच्या ताफ्यात आता एकूण ३०० विमाने झाली असून, १०३ ठिकाणी सेवा दिली जात आहे. त्यात ५५ देशांतर्गत आणि ४८ आंतरराष्ट्रीय ठिकाणांचा समावेश आहे.

सध्या संपूर्ण एअर-इंडिया समूहाकडून ३१२ मार्गांवर सेवा दिली जात असून, त्यात १६० देशांतर्गत आणि १५२ आंतरराष्ट्रीय मार्गांचा समावेश आहे.

एअर इंडिया समूहाकडील विमाने

एअर इंडिया – १४०

विस्तारा – ७०

एअर इंडिया एक्स्प्रेस – ९०

एकूण – ३००

देशांतर्गत मार्ग – १६०

आंतरराष्ट्रीय मार्ग – १५२

आठवड्याला उड्डाणे – ८,५००

Story img Loader