पुणे : काही दिवसांपासून चर्चेत असलेली बजाज ऑटोकडून सादर होणारी सीएनजी दुचाकी येत्या १८ जूनला सादर केली जाईल, अशी घोषणा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी शुक्रवारी केली. बजाज ऑटोने ‘पल्सर एनएस ४०० झेड’ ही दुचाकी शुक्रवारी सादर केली. यावेळी बोलताना बजाज म्हणाले की, इंधनाच्या खर्चात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने ग्राहकांना परवडेल अशा इंधनावरील दुचाकीचा विचार सुरू होता. त्यातून सीएनजीवर चालणाऱ्या दुचाकीची कल्पना समोर आली. कारण सीएनजीवर चालणाऱ्या मोटारी आणि तीनचाकी वाहनांमुळे इंधन खर्चात मोठी कपात होते. हाच विचार डोळ्यासमोर ठेवून सीएनजी दुचाकीची निर्मिती करण्यात येत आहे.

हेही वाचा >>> अदानी समूहातील सहा कंपन्यांना ‘सेबी’ची कारणे दाखवा नोटीस

James Anderson World Record in Last Test Match
James Andersonने अखेरच्या सामन्यात केला विश्वविक्रम, कसोटी क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला गोलंदाज
Why West Indies Did Not Give Guard of Honour to James Anderson
ENG vs WI: जेम्स अँडरसनला वेस्ट इंडिज संघ ‘गार्ड ऑफ ऑनर’ देणार होता पण… खेळाडूने सांगितलं मैदानात नेमकं काय घडलं?
Ben Stokes Creates History in Test Cricket
Ben Stokesने कसोटी क्रिकेटमध्ये रचला इतिहास, इंग्लंडसाठी ही कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू
Indian Cricket Team Schedule of Sri Lanka Tour
IND vs SL मालिकेचं वेळापत्रक जाहीर, प्रशिक्षक म्हणून गंभीर पर्वाला होणार सुरूवात; राहुल-हार्दिककडे कर्णधारपद?
When And Where To Watch Zimbabwe Vs India 3rd T20 Match Live Telecast
IND vs ZIM मधील अखेरचे दोन टी-२० सामने कुठे लाइव्ह पाहता येणार? जिओ, हॉटस्टर नाही तर…
tharala tar mag purna aaji slaps priya
पूर्णा आजीने प्रियाला लगावली कानशिलात! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, ‘या’ दिवशी असणार विशेष भाग
India Vs Bangladesh Weather Report
IND vs BAN : भारतासाठी विजय आवश्यक, पावसामुळे सामना रद्द झाला किंवा हरला तर काय होणार? जाणून घ्या समीकरण
pat cummins took hattick against bangladesh
Aus vs Ban T20 World Cup: ब्रोकन हॅट्ट्र्रिक म्हणजे काय? पॅट कमिन्स का गेला विसरुन हॅट्ट्र्रिकचा विक्रम

बजाजची सीएनजी दुचाकी १८ जूनला सादर केली जाणार आहे. या दुचाकीमुळे इंधन खर्चात सुमारे ५० टक्के बचत होईल. ‘पल्सर एनएस ४०० झेड’ ही स्पोर्ट्स बाईक श्रेणीतील आणि एनएस मालिकेतील दुचाकी आहे. आधी कंपनीने एनएस १२५, एनएस १६०, एनएस २०० या दुचाकी सादर केल्या होत्या. ‘एनएस ४०० झेड’ची इंजिन क्षमता ३७३.२७ सीसी आहे. याचबरोबर तिच्यामध्ये वेगवेगळे राईड मोड आणि स्लीपर क्लच आहे. त्यामुळे दुचाकीवरील नियंत्रण आणखी वाढून चालकाला चालविण्याचा चांगला अनुभव मिळतो. ही दुचाकी चार रंगात उपलब्ध करून देण्यात आली असून, तिची किंमत दिल्लीत १ लाख ८५ हजार रुपये (एक्स शोरूम) आहे.