scorecardresearch

Premium

आजपासून पाच मोठे नियम बदलले, ‘या’ कामांची मुदतही सप्टेंबरमध्ये संपणार; थेट खिशावर होणार परिणाम

सप्टेंबरपासूनच काही नवीन नियम लागू झाले आहेत. यामध्ये आधार अपडेटपासून नॉमिनीपर्यंत आणि डीमॅट खात्यासाठी केवायसी अपडेटपर्यंतचे अनेक नियम समाविष्ट आहेत.

New Rules From 1st October
१ ऑक्टोबरपासून २००० रुपयांच्या नोटेपासून डेबिट अन् क्रेडिट कार्डापर्यंत 'हे' ८ नियम बदलणार (फोटो- फाइल)

Rule Changes from 1 September 2023 : नवीन महिन्याच्या सुरुवातीला बरेच मोठे बदल दिसत आहेत. या महिन्यातही अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. सप्टेंबरपासूनच काही नवीन नियम लागू झाले आहेत. यामध्ये आधार अपडेटपासून नॉमिनीपर्यंत आणि डीमॅट खात्यासाठी केवायसी अपडेटपर्यंतचे अनेक नियम समाविष्ट आहेत. आजपासून कोणते बदल होणार आहेत ते जाणून घेऊया.

अवघ्या तीन दिवसांत IPO लिस्टिंग

शेअर बाजारातील कोणत्याही आयपीओचे सबस्क्रिप्शन बंद केल्यानंतर त्याच्या लिस्टिंगसाठी ६ दिवस लागत होते, परंतु आता ते केवळ तीन दिवसांवर आणले गेले आहे. सेबीने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आयपीओची लिस्टिंग आता फक्त तीन दिवसांत केली जाणार आहे आणि हा नवीन नियम १ सप्टेंबरपासून लागू झाला आहे.

allotment JNPT developed plots, Project victims instructed CIDCO Bhawan documents
जेएनपीटी साडेबारा टक्के भूखंड प्रकिया ३ ऑक्टोबर पासून सुरू होणार; सिडको भवनात दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत कागदपत्रे स्वीकारणार
pitru paksha 2023, pitru paksha 2023 started from 29 september, pitru paksha 2023 dates
Pitru Paksha 2023 : यंदा पितृपक्ष २९ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबरपर्यंत…आजपासून प्रारंभ
mutual fund
म्युच्युअल फंड-डीमॅटसह पर्नसल फायनान्सशी संबंधित ‘हे’ पाच नियम १ ऑक्टोबरपासून बदलणार, जाणून घ्या सर्वकाही
50,000 crore fund raising possible September bonds
रोख्यांच्या माध्यमातून सप्टेंबरमध्ये ५०,००० कोटींपर्यंत निधी उभारणी शक्य

म्युच्युअल फंड नियमांमध्ये बदल

SEBI ने म्युच्युअल फंड योजनांच्या डायरेक्ट स्कीमसाठी एकमात्र एक्झिक्युशन प्लॅटफॉर्मसाठी नियामक फ्रेमवर्क सादर केले आहेत. नवीन नियमांमुळे गुंतवणूकदारांना केवळ एक्झिक्युशन प्लॅटफॉर्म (EOP) तसेच योग्य गुंतवणूकदार संरक्षण यंत्रणेद्वारे गुंतवणूक करणे सोयीचे होणार आहे. त्यामुळे व्यवसाय करणे सोपे जाईल. हा नियम १ सप्टेंबरपासून लागू झाला आहे.

क्रेडिट कार्डचे नियम बदलले

अॅक्सिस बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबरपासून क्रेडिट कार्ड असलेल्या युजर्ससाठी मॅग्नस खास आहे. मॅग्नस क्रेडिट कार्ड धारकांना यापुढे काही व्यवहारांवर सूट दिली जाणार नाही. तसेच अशा कार्डधारकांना १ सप्टेंबरपासून शुल्क भरावे लागेल.

टेक होम पगार जास्त मिळणार

प्राप्तिकर विभाग १ सप्टेंबरपासून भाडेमुक्त निवासाच्या (rent free accommodation) नियमात बदल करणार आहे. या अंतर्गत नियोक्त्याकडून जास्त पगार आणि भाड्याने राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता अधिक बचत करता येणार आहे. या नियमानुसार पगारातील कर कपात कमी असेल आणि कर्मचाऱ्यांना टेक होम पगार जास्त मिळेल.

हेही वाचाः LPG सिलिंडरच्या किमतीत १५८ रुपयांची कपात, नवे दर काय?

एटीएफ किंमत

१ सप्टेंबरपासून जेट इंधन म्हणजेच ATF च्या किमतीत बदल करण्यात आला आहे. १ सप्टेंबरपासून नवी दिल्लीत जेट इंधन १,१२,४१९.३३ रुपये झाले आहे, जे पूर्वी ९८,५०८.२६ रुपये प्रति किलोलिटर होते. म्हणजेच त्याची किंमत १३,९११.०७ रुपये प्रति किलोने वाढली आहे.

हेही वाचाः विश्लेषण : सिलिंडरपाठोपाठ मोदी सरकार आता पेट्रोल-डिझेल स्वस्त करण्याच्या तयारीत?

सप्टेंबरमध्ये ‘या’ तीन महत्त्वाच्या गोष्टी आठवणीने करा

मोफत आधार कार्ड अपडेट करा

UIDAI द्वारे मोफत आधार अपडेट करण्याची अंतिम मुदत आता १४ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ही तारीख १४ जूनपर्यंत होती. आता तुम्ही माय आधार पोर्टलवर ते मोफत अपडेट करू शकता. नंतर यावर ५० रुपये शुल्क आकारले जाईल.

२००० रुपयांच्या नोटा बदलण्याची अंतिम मुदत

तुमच्याकडे २ हजार रुपयांची नोट असेल, तर तुम्हाला ती आताच बदलावी लागणार आहे, कारण ३० सप्टेंबरनंतर तुम्ही ती बदलू शकणार नाही. २००० रुपयांच्या नोटा वितरणातून बाद करण्यासाठी आरबीआयने ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे.

नॉमिनी जोडण्याची शेवटची संधी

सेबीने डिमॅट खात्यात नामांकन करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. हे ३० सप्टेंबरपूर्वी पूर्ण करावे लागेल. असे न केल्यास तुम्ही तुमच्या डीमॅट खात्यातून व्यापाराशी संबंधित काम करू शकणार नाही आणि व्यवहारदेखील ब्लॉक केला जाऊ शकतो.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Five major rules changed from 1 september 2023 the term of 2000 rupees note change works will also expire in september direct pocket impact vrd

First published on: 01-09-2023 at 11:59 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×