पीटीआय, हैदराबाद

भारताने विकसित देश बनण्यासाठी आधी कुपोषणासारख्या समस्या सोडवायला हव्यात. याचबरोबर मनुष्यबळ ही सर्वांत मोलाची संपत्ती असून, त्याकडे देशाला लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी सोमवारी येथे मांडले.

येथे इंडियन स्कूल ऑफ बिझनेस संकुलात आयोजित कार्यक्रमात राजन बोलत होते. कुपोषणाची समस्या असलेला देश विकसित कसा बनू शकतो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, आपण तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेसह, २०४७ पर्यंत विकसित देशांच्या पंक्तीत जाण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. उदाहरणादाखल बोलायचे झाल्यास २०४७ मध्ये विकसित आणि श्रीमंत असलेल्या देशात ३५ टक्के कुपोषित असतील तर तुमचे हे उद्दिष्ट विनोदाचा विषय ठरेल. कारण आता लहान असलेली मुले १० वर्षांनी त्यासमयी उत्पादक मनुष्यबळात दाखल झालेले असतील.

हेही वाचा >>>सात रुपयांची कागदी पिशवी अन् फॅशन ब्रँडला भरावा लागला ३०० पट अधिकचा दंड; नेमकं झालं काय? वाचा

security forces on high alert in jammu and kashmir due to hidden terrorism
छुप्या दहशतवादाचे हत्यार! जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणांना अतिदक्षता बाळगण्याचे आदेश
The Indian Patent Office rejected Johnson and Johnson application Mumbai
क्षयरोगग्रस्त बालकांना स्वस्तात औषध मिळण्याचा मार्ग मोकळा;  भारतीय पेटंट कार्यालयाने फेटाळला जॉन्सन ॲण्ड जॉन्सनचा अर्ज
strict law to control bogus pathology labs says minister uday samant
बोगस पॅथोलॉजी लॅबवर नियंत्रणासाठी कठोर कायदा – सामंत
principal, vehicle, female employees,
मानसिक त्रास देण्यासाठी प्राचार्यांनी दिले महिला कर्मचाऱ्यांच्या वाहनातील हवा सोडण्याचे आदेश, प्राचार्यांच्या अजब प्रतापाविरोधात….
The role of SEBI  SAT is important to maintain investment friendly environment
‘गुंतवणुकीस्नेही वातावरण राखण्यास सेबी, सॅटची भूमिका महत्त्वपूर्ण’; बाजारातील उधाणाबाबत सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा सावधगिरीचा इशारा
india China Foreign Ministers discuss peace
भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांची शांततेवर चर्चा; पूर्व लडाखच्या वादावर लवकर तोडगा काढण्यावर विचारमंथन
Karnataka High Court, Prosecuting Women Victims of Forced Prostitution , forced prostitution, Applicable Laws ,pita law, chatura article,
देहविक्रेय व्यवसायाच्या शिकार महिलेस दंडित करणे कायद्याचा उद्देश नाही…
islamic law blood money
ब्लड मनी म्हणजे काय? या इस्लामिक कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा कशी रद्द होते?

देशातील मनुष्यबळाला योग्य दिशा देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी तरुणांना व्यापक स्तरावर प्रशिक्षण द्यायला हवे. मध्यम कालावधीसाठी अर्थव्यवस्थेची योग्य वाटचाल करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम मनुष्यबळावर लक्ष केंद्रित करावेच लागेल. आपल्याकडे १४० कोटी इतकी लोकसंख्या असून, ती जगातील इतर कोणत्याही देशांपेक्षा जास्त आहे. आपण जर मोठ्या संख्येने लोकांना प्रशिक्षित करू शकलो तर मूल्यवर्धनाच्या बाबतीत आपण मोठा टप्पा गाठू. आतापासूनच सुरुवात करून कुठे चुका होताहेत हे तपासून त्या दुरुस्त करायला हव्यात, असेही राजन यांनी स्पष्ट केले.

बँकिंग व्यवस्थेची स्वच्छता पूर्ण

बँकिंग व्यवस्था स्वच्छ करण्याची मोहीम राजन यांनी गव्हर्नरपदी असताना हाती घेतली होती. या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले की, बँकिंग व्यवस्था स्वच्छ होण्यासाठी खूप काळ लागला. आता बँकिंग व्यवस्था स्वच्छ झाली आहे, असे मला निश्चितच वाटते.