scorecardresearch

‘फॉक्सकॉन’ची पंतप्रधान मोदींना वाढदिवसाची भेट; भारतातील गुंतवणूक, व्यवसाय दुपटीने वाढविणार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन करताना कंपनीने समाज माध्यमावर केलेल्या टिपणीतून ही घोषणा केली आहे.

Foxconn aims double employment, investment business India next year, announced Prime Minister Narendra Modi birthday
‘फॉक्सकॉन’ची पंतप्रधान मोदींना वाढदिवसाची भेट; भारतातील गुंतवणूक, व्यवसाय दुपटीने वाढविणार! (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पीटीआय, नवी दिल्ली

ॲपल आयफोनचे कंत्राटी उत्पादन घेणाऱ्या फॉक्सकॉन कंपनीने भारतात पुढील वर्षापर्यंत रोजगार, गुंतवणूक आणि व्यवसाय दुपटीने वाढविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन करताना कंपनीने समाज माध्यमावर केलेल्या टिपणीतून ही घोषणा केली आहे.

amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
bachchu kadu on pankaja munde
“…म्हणून पंकजा मुंडेंवर कारवाई झाली असावी”, बच्चू कडूंचं थेट विधान

फॉक्सकॉनने पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना म्हटले आहे की, तुमच्या नेतृत्वाखाली फॉक्सकॉनची भारतात वेगाने वाढ सुरू आहे. पुढील वर्षापर्यंत आम्ही तुम्हाला वाढदिवसाची मोठी भेट देणार आहोत. भारतातील आमच्याकडून निर्मित रोजगार, थेट परकीय गुंतवणूक आणि व्यवसाय दुपटीने वाढविण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

हेही वाचा… अदानी-हिंडेनबर्गप्रकरणी नियुक्त तज्ज्ञसमितीवरही आक्षेप; सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल; कामत, भट्ट यांच्या समावेशाला आव्हान

फॉक्सकॉनच्या या घोषणेला प्रतिसाद म्हणून केंद्रीय माहिती-तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अभिप्राय दिला आहे. कंपनीच्या विस्तार योजनेला पाठबळ देण्यासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याची ग्वाही वैष्णव यांनी त्यात दिली. दरम्यान, चालू महिन्याच्या सुरूवातीला फॉक्सकॉनचे अध्यक्ष यंग लिऊ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, भारत हा उत्पादनासाठी अतिशय महत्त्वाचा देश असल्याचे नमूद केले होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-09-2023 at 11:52 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×