मुंबई: आघाडीची औषध निंर्माता कंपनी असलेल्या ग्लेनमार्क फार्माच्या संचालक मंडळाने आंशिक समभाग विक्री अर्थात ओएफएसच्या माध्यमातून ग्लेनमार्क लाइफ सायन्सेसमधील ७.८४ टक्के हिस्सा विक्रीला बुधवारी मान्यता दिली. यातून या कंपनीतील सर्व उर्वरित भागमालकी विकून, ग्लेनमार्क फार्मा पूर्णपणे बाहेर पडणार आहे.

संचालक मंडळाने ग्लेनमार्क लाइफ सायन्सेस लिमिटेडच्या (जीएलएस) एकूण ९६,०९,५७१ समभागांच्या विक्रीला मान्यता दिल्याचे ग्लेनमार्क फार्माने शेअर बाजाराला अधिकृतपणे माहिती दिली. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स आणि तिचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ग्लेन मारिओ साल्दान्हा यांच्याकडून ८१० रुपये प्रति समभागाप्रमाणे ग्लेनमार्क लाइफ सायन्सेसच्या समभागांची विक्री केली जाणार आहे. ही आंशिक समभाग विक्री ११ ते १२ जुलैदरम्यान खुली असेल, असे कंपनीने म्हटले आहे.

IAS Puja Khedkar
IAS Pooja Khedkar : पूजा खेडकरचा आणखी एक प्रताप समोर; दिव्यांग असल्याचे सांगून UPSC परीक्षेत मिळवली सूट
maharashtra mlc election final result list (1)
Maharashtra MLC Election Result: विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटील पराभूत; नेमकी कुणाची मतं कुणाकडे गेली?
IAS Pooja Khedkar father Dilip Khedkar
Pooja Khedkar Father First Reaction : IAS पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “माझ्या मुलीने चूक…”
Pooja Khedkar First Reaction
Pooja Khedkar : वादानंतर IAS पूजा खेडकर पहिल्यांदाच आल्या माध्यमांसमोर; घडल्या प्रकाराबाबत विचारणा केली असता म्हणाल्या…
IAS Pooja Khedkar WhatsApp Chat Pune Collector Office
Pooja Khedkar Chat : “सर्व व्यवस्था करून ठेवा…”, पूजा खेडकर यांचे ‘ते’ व्हॉट्सॲप चॅट व्हायरल
Rahul Gandhi, Rahul Gandhi's Lok Sabha Speech, Opposition Leader Rahul Gandhi, bjp senior leaders rebuttal Rahul Gandhi, amit shah, bjp, Rajnath singh, congress, lok sabha, vicharmanch article, loksatta article,
भ्रमाचा भोपळा फुटलाय, हे सत्य स्वीकारा…
Suchitra Krishnamoorthi attended naked party
बर्लिनमध्ये Naked Party मध्ये सहभागी झाली बॉलीवूड अभिनेत्री, २० मिनिटांत काढला पळ; म्हणाली, “मला कुणाचेही प्रायव्हेट पार्ट…”
Mark Rutte bicycle video
ना जाहिरातबाजी, ना सोहळा… ‘या’ देशाचे पंतप्रधान राजीनामा देऊन सायकलवर बसून घरी गेले, VIDEO व्हायरल

हेही वाचा >>>टाटा-महिंद्रकडून ‘एसयूव्ही’च्या किमतीत कपात

या निर्णयाच्या परिणामी राष्ट्रीय शेअर बाजारात जीएलएसचा समभाग १.२ टक्क्यांनी घसरून प्रत्येकी ८७८ रुपयांवर बंद झाला. तर ग्लेनमार्क फार्माचे समभाग १.७ टक्क्यांनी वधारून १,३८२ रुपयांवर बंद झाला.जीएलएस निवडक सक्रिय फार्मास्युटिकल घटकांची प्रमुख विकसक आणि निर्माता कंपनी आहे. कंपनी हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, मध्यवर्ती मज्जासंस्थेचे रोग, वेदनाशमन आणि मधुमेह यासह दीर्घकालीन उपचारात्मक क्षेत्रांमधील औषधांची निर्मिती करते.

मार्चमध्ये, निरमा समूहाने ग्लेनमार्क लाइफ सायन्सेसमधील ७५ टक्के हिस्सेदारीचे संपादन पूर्ण केले. त्यांनी ९.१९ कोटी समभाग खरेदी केले असून निरमा आता ग्लेनमार्क लाइफ सायन्सेसची प्रवर्तक बनली आहे.