Gold Price At All Time High : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी फेडरल रिझर्व्हवर व्याजदर कमी करण्यासाठी दबाव आणणार असल्याचे म्हटल्यानंतर शुक्रवारी सोन्याच्या किमतीत उल्लेखनीय तेजी आली आहे. त्यानंतर शुक्रवारी, एमसीएक्स गोल्ड फ्युचर्समध्ये सोन्याच्या प्रति १० ग्रॅम दराने ८०,३१२ रुपयांचा सर्वकालीन उच्चांक गाठला तर स्पॉट मार्केटमध्ये सोन्याने ८३,००० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान फ्युचर्सच्या किमती आणि स्पॉट मार्केट किमतींमधील फरक सोन्यावरील ३% जीएसटी आणि त्याच्या प्रीमियममुळे आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणामुळे सोन्याला झळाली

एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमोडिटी आणि करन्सी प्रमुख अनुज गुप्ता म्हणाले की, “दावोस येथील जागतिक आर्थिक मंचात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या भाषणामुळे सोन्याच्या किमतीत तेजी आली आहे.” गुप्ता पुढे म्हणाले की, “जानेवारीमध्ये आतापर्यंत एमसीएक्स गोल्ड फ्युचर्सच्या किमतीत ४.५% किंवा ३,४४८ रुपयांची वाढ झाली आहे.” शुक्रवारी सोन्याने ८३,००० रुपयांचा टप्पा ओलांडल्याच्या वृत्तालाही त्यांनी दुजोरा दला आहे.

Gold price down gold silver price silver nagpur city rate
सुवर्णवार्ता… सोन्याच्या दरात नऊ तासात आपटी.. हे आहे आजचे दर…
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
Gold Silver Price Today
Gold Silver Price Today :सोन्याच्या दरात विक्रमी वाढ, गेल्या महिन्याभरात तब्बल ६ हजार रुपयांनी वाढले दर; वाचा, आजचा सोन्या- चांदीचा भाव
Gold Silver Price Today
Gold silver Rate Today : ‘व्हॅलेंटाईन वीक’ सुरू होताच सोनं महागलं; खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचा दर
Gold and silver prices rise by Rs 3,100 per 10 grams and Rs 4,000 per kilogram in the past week.
Gold Rate : आठवड्याभरात सोन्याचे भाव हजारो रुपयांनी वाढले, चांदीही चकाकली
rupee crosses 87 against dollar news in marathi
रुपया डॉलरमागे ८७ पार; सोने ८५ हजारांपुढे!, रुपयाच्या आणखी घसरणीची शक्यता
Global stock markets crash following a controversial decision by Donald Trump.
Global Share Market Crash : डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा जगभरातील गुंतवणूकदारांना फटका, आयात शुल्क वाढीमुळे जागतिक शेअर बाजार कोसळले
Union Budget 2025 Gold Silver Price
Gold Silver Price Today : अर्थसंकल्पापूर्वी सोन्याचा दर ८२ तर चांदी ९३ हजार पार; दरात होतील का मोठे बदल? जाणून घ्या आजचे दर

सोने खरेदीचा योग्य दर काय?

दरम्यान गुप्ता यांनी सोने खरेदीबाबत आशावाद व्यक्त केल असून, सुमारे ७५,५००-७५,७०० रुपयांच्या किमतीत सोने खरेदी योग्य असल्याचे म्हटले आहे. त्यांनी या वर्षी धनत्रयोदशीपर्यंत ७१,५०० रुपयांचा स्टॉप लॉस ठेवला आहे तर टार्गेट प्राइज ८५,३००-८७,००० रुपये ठेवली आहे. याबाबत इकोनॉमिक टाइम्सने वृत्त दिले आहे.

यापूर्वी, पीटीआयने ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या हवाल्याने स्पॉट मार्केटमध्ये ९९.९ टक्के शुद्धतेचे सोने ८३,१०० रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर पोहोचल्याचे वृत्त दिले होते.

अमेरिकन धोरणांचा परिणाम

“शुक्रवारी सोन्याच्या किमतीत वाढ झाली असून, स्थानिक बाजारपेठेतही स्पॉट गोल्डने नवीन उच्चांक गाठला आहे. सोन्यातील सध्याची तेजीची गती अमेरिकेच्या संभाव्य टॅरिफ योजना आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इतर धोरणांबाबत असलेल्या अनिश्चिततेमुळे आहे, ज्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या खरेदीमध्ये वाढ झाली आहे”, असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ कमोडिटीज विश्लेषक सौमिल गांधी म्हणाले. याबाबत इकोनॉमिक टाइम्सने वृत्त दिले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे अध्यक्षीय निवडणूक जिंकल्यापासून अनेक धोरणांमध्ये बदल करण्याचे इशारे दिले आहेत. त्यामुळे शेअर बाजारासह सोने बाजारावरही त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे.

Story img Loader