Gold Silver Today’s Price : गेल्या काही महिन्यापासून सोने चांदीच्या दरात चढ उतार दिसून येत आहे. गणेशोत्सवा दरम्यान मात्र सोने चांदीचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर आले. १३ सप्टेंबर २०२४, शुक्रवारी सोने चांदीच्या दरात वाढ दिसून आली. १० ग्रॅम सोने ७३,८१० रूपयांना आणि चांदी ८९,१६० रुपये किलो होती. सोने चांदीच्या वाढलेल्या दराची सध्या सगळीकडे चांगलीच चर्चा होत आहे.

सोने चांदीचे दर

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ६७,६५९ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७३,८१० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीची किंमत ८९२ रुपये आहे म्हणजेच चांदी ८९,१६० रुपये किलोनी विकली जात आहे. आज जरी सोने चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही तरी गेल्या आठवड्याच्या तुलनेत सोने चांदीच्या दर चांगलेच वाढले आहेत.

हेही वाचा : जयगड, धरमतर बंदरांचा क्षमता विस्तार; ‘जेएसडब्ल्यू इन्फ्रा’ची २,३५९ कोटींच्या गुंतवणुकीची योजना

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६७,५४० रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७३,६८० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६७,५४० रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७३,६८० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६७,५४० रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७३,६८० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६७,५४० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७३,६८० रुपये आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोने खरेदी करताना हॉलमार्क का महत्त्वाचा?

हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे होय. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते.सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे.१ एप्रिल २०२३ पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.