Gold Silver Rate Today 24 January 2024 : वर्षाच्या पहिल्या महिन्यात अनेक जण आवडीने नवीन वस्तू किंवा सोने चांदीचे दागिने खरेदी करतात. सध्या लग्नसराई सुरू असल्याने सोने चांदीच्या खरेदीमध्ये लक्षणीय वाढ दिसून येत आहे. लोकांचा खरेदीकडे कल वाढल्याने सोने चांदीच्या दरात सुद्धा चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
गेल्या महिन्याच्या तुलनेत चार साडेचार हजाराने सोने महागले आहे. तसेच चांदीच्या दरात सुद्धा झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. आज १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ८०, २९० रुपये तर चांदीचा दर ९२, १३० रुपये किलो आहे. सोने चांदीच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार. जाणून घेऊ या, आजचा सोने चांदीचा दर कसा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोने चांदीचे दर

बुलियन मार्केटनुसार, आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ७३,५९९ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ८०,२९० रुपये आहे. याशिवाय, १० ग्रॅम चांदीची किंमत ९२१ रुपये आहे म्हणजेच चांदी ९२,१३० रुपये प्रति किलोनी विकली जात आहे.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७३,४७१ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ८०,१५० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७३,४७१ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ८०,१५० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७३,४७१ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ८०,१५० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७३,४७१ रुपये आहे.४ कॅरेट सोन्याचा दर ८०,१५० रुपये इतका आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

एका महिन्यापूर्वी १० ग्रॅम २४ कॅरेटसाठी सोन्याचा दर ७६,४२० रुपये होता तर चांदीचा तर ८९,३७० रुपये होता. तसेच, एका आठवड्यापूर्वी २४ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ७९,३५० रुपये होता तर चांदीचा दर ९१,६९० रुपये होता.

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.