Gold Silver Rate Today : सध्या लग्नसराई सुरू आहे त्यामुळे सोने खरेदीकडे लोकांचा कल वाढला आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात चढ उतार दिसून येत आहे. ९ डिसेंबर सोमवारी, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात थोडी घसरण दिसून आली होती पण मंगळवारी पुन्हा सोन्याचे दर वाढले. तुम्ही जर सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दर जाणून घेऊ या.

सोने चांदीचे दर (Gold Silver Rate)

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ७१,२७१ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७७,७५० रुपये आहे. याशिवाय, १० ग्रॅम चांदीची किंमत ९५० रुपये आहे म्हणजेच चांदी ९४,९९० रुपये प्रति किलोनी विकली जात आहे. सोमवारी चांदीचा दर ९५,०१० रुपये प्रति किलो होता तर १० ग्रॅम सोन्याचा दर ७७,५७० रुपये होता.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

आज सोने १८० रुपयांनी वाढले असून चांदीचा दर फक्त २० रुपयांनी घसरला आहे. येत्या दिवसांमध्ये सोने चांदीच्या दरात चढ उतार दिसून येईल.

हेही वाचा : व्याज दरकपात नाहीच!‘जीडीपी’वाढीच्या अपेक्षांना कात्री; महागाईचा ताप चढण्याचा रिझर्व्ह बँकेचा अंदाज

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७२,१८८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७८,७५० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७२,१८८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७८,७५० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७२,१८८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७८,७५० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७२,१८८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७८,७५० रुपये आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

‘वन नेशन, वन गोल्ड रेट’ अर्थात देशभरात सर्वत्र सोन्याचे एकसमान दर लागू करण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात असल्याचे रत्न व आभूषण उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ऑल इंडिया जेम ॲण्ड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलने (जीजेसी) मंगळवारी सांगितले.

Story img Loader