Today’s Gold Silver Price गणेशोत्सवानिमित्त अनेकजण सोने-चांदी खरेदी करतात, मात्र गेल्या काही दिवसांपासून सोने – चांदीच्या दरात सतत चढ- उतार दिसून येत आहे. यात आज म्हणजे गुरुवारी सोन्याच्या किमतीत वाढ दिसून आली, तर चांदीचे दरही वाढले आहेत. पण तुमच्या शहरात सध्या सोन्या-चांदीचा काय दर आहे, जाणून घ्यायचा असेल तर ही बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा. चला तर मग जाणून घेऊ तुमच्या शहरातील आज सोने चांदीचे दर कसे आहेत?

आज १२ सप्टेंबर रोजी देशात दोन दिवसांच्या तुलनेत आज सोने- चांदीच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले. आज देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याच दर ७२,२३० रुपये आहे, तर १ किलो चांदीचा दर ८४,५५० रुपये आहे. एकूण आठवड्याभराचा विचार केल्यास सोन्याच्या दरात ५०० ते १००० रुपयांच्या दरम्यान वाढ आणि घसरण दिसून येतेय, तर चांदीचे दरही २०० ते ४०० दरम्यान वाढे आहे.

Gold and silver prices
Gold Silver Rate : अचानक सोन्या चांदीचे दर घसरले! जाणून घ्या, किती रुपयांनी झाले स्वस्त?
Shantanu Naidu ratan tata youngest friend
कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची…
Gold Silver Price Today 27 September 2024
Gold Silver Price Today : सोन्या- चांदीच्या किंमतीत घसरण! किती रुपयांनी झाले स्वस्त?जाणून घ्या तुमच्या शहरातील नवीन भाव…
Gold price Today
सोनं महागलं! दहा ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागणार इतके पैसे; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा दर
gold price hike in during Navratri festival
ऐन नवरात्राच्या तोंडावर सोन्याच्या दरात बदल… आता २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्रॅम…
Today's Gold & Silver Rates for Pitrupaksha
Gold Silver Price Today : पितृपक्षात सोने खरेदी करताय? जाणून घ्या, आजचा सोन्या- चांदीचा भाव
png jewellers ipo analysis
पीएनजी ज्वेलर्सच्या ‘आयपीओ’त शेवटच्या दिवशी ५९.४१ पट भरणा
Why Gold Price High in Marathi
Gold Price High: सोन्याच्या किंमती इतक्या का वाढल्या आहेत? असं अचानक घडलंय तरी काय?

देशात आज सोन्याचे- चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 12 September 2024)

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज देशात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचे दर ७२,२३० रुपये आहे,तर २२ कॅरेटचे दर ६६,२११ रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचे दर ८४६ रुपये आहे तर १ किलो चांदी ८४,५५० रुपयांनी विकली जात आहे. त्यामुळे आज गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत सोन्या-चांदीचे दरात वाढ झाल्याची दिसून आली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांमध्येही या दरात चढ उतार झाले आहेत.

आदल्या दिवशीचा म्हणजे ३ सप्टेंबर २०२४ रोजी १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७२, २३० रुपये होता, तर १ किलो चांदीचा दर ८४,३९० रुपये होता.यावरुन तुमच्या लक्षात येईल की,आज सोन्याचे दर कालच्या तुलनेत आज समान आहे पण चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार जाणून घेऊया तुमच्या शहरांमधील सोन्या-चांदीचे दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६६,१२८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ७२,१४० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,१२८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,१४० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,१२८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७२,१४० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,१२८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,१४० रुपये आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?
२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

सोने खरेदी करताना हॉलमार्क का महत्त्वाचा?
हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे होय. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते.सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे.१ एप्रिल २०२३ पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.