Today Gold Silver Price : गणेशोत्सवानिमित्त सोने-चांदी खरेदीवर विशेष ऑफर्स मिळत असल्याने अनेक ग्राहक या काळात सोने- चांदी खरेदीचा विचार करतात. पण अशावेळा आज सोने- चांदीचे दर नेमके काय आहेत यावरुन गोंधळ असतो. पण काळजी नका करु आम्ही तुम्हाला आज तुमच्या शहरात सोने-चांदीचे दर नेमके काय आहेत सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ तुमच्या शहरातील आज सोने चांदीचे दर कसे आहेत?
आज ८ सप्टेंबर रोजी देशात सलग दुसऱ्या दिवशी सोने- चांदीचे दर स्थिर असल्याचे दिसून आले. देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याच दर ७१, ७२० रुपये आहे, तर १ किलो चांदीचा दर ८२, ७५० रुपये आहे. एकूण आठवड्याभराचा विचार केल्यास सोन्याच्या दरात १०० ते ८०० रुपयांच्या दरम्यान चढ-उतार दिसून येतो, तर चांदीच्या दराच घसरण होत आहे.
देशात आज सोन्याचे- चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 8 September 2024)
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज देशात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचे दर ७१,७२० रुपये आहे, तर २२ कॅरेटचे दर ६५, ७४३ रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचे दर ८२८ रुपये आहे तर १ किलो चांदी ८२,७२० रुपयांनी विकली जात आहे. त्यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे दर स्थिर दिसून आले. विशेष देशात सलग दुसऱ्या दिवशी सोने- चांदीचे दर स्थिर असल्याने मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांमध्येही हे दर एकसारखे आहेत.
हेही वाचा – होंडा शाइनसह ‘या’ ३ बाईक्समध्ये मिळणार भरपूर मायलेज अन् किंमत ७० हजारांपेक्षा कमी
आदल्या दिवशीचा म्हणजे ३ सप्टेंबर २०२४ रोजी १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७१, ७२० रुपये होता, तर १ किलो चांदीचा दर ८२,७५० रुपये होता.यावरुन तुमच्या लक्षात येईल की,आज सोन्या-चांदीचे दर जैसे थेच आहेत.
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार जाणून घेऊया तुमच्या शहरांमधील सोन्या-चांदीचे दर
शहर | २२ कॅरेट सोन्याचा दर | २४ कॅरेट सोन्याचा दर |
मुंबई | २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६५,६२४ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याची किंमत ७१,५९० प्रति १० ग्रॅम आहे. |
पुणे | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,६२४ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,५९० रुपये आहे. |
नागपूर | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,६२४ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,५९० रुपये इतका आहे. |
नाशिक | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,६२४ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,५९० रुपये आहे. |
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?
सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की, तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे.जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.
२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.