Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७२,३९० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७१,३५० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ८५,२४० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८३,०४० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६६,२२९ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ७२,२५० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,२२९ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,२५० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,२२९ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,२५० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,२२९ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,२५० रुपये आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold silver prices on friday maharashtra 10 may 2024 mumbai pune nagpur nashik new price pdb