Gold-Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं चढउतार उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कधी सोन्याच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळत आहे. आज शुक्रवारी सोन्याच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळालं आहे. तर चांदीच्या दरातही बदल झाला आहे. मुंबईसह राज्यभरात सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६८,११० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७२,८९० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ८१,६२० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८९,०२० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

Gold-Silver Price
Gold-Silver Price: सोने घसरणीनंतर किमतींमध्ये झाले मोठे बदल, पाहा मुंबई-पुण्यात काय सुरुये १० ग्रॅमचा भाव 
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Gold Silver Price Today
Gold-Silver Price: घसरणीनंतर सोन्याचे दर कडाडले, पाहा मुंबई-पुण्यातील १० ग्रॅम सोन्याची किंमत
Gold Silver Price
Gold-Silver Price: घसरणीनंतर सोन्याच्या दरात बदल, मुंबई-पुण्यात १० ग्रॅमची किंमत आता…
Gold Silver Price
Gold-Silver Price: दरवाढीनंतर सोन्याचे भाव कोसळले; १० ग्रॅमचा भाव ऐकून गाठाल सराफा बाजार!
Gold Silver Price
Gold-Silver Price: सोन्याचा भाव ऐकून बाजारात उडाली खळबळ; जाणून घ्या १० ग्रॅम सोन्याची किंमत
Gold Silver Price 25 July 2024
Gold-Silver Price: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! सोने झाले स्वस्त; १० ग्रॅमचा दर पाहून बाजारात उसळली गर्दी
Gold Silver Price
Gold-Silver Price: स्वस्त झालेले सोने पुन्हा महागले; मुंबई-पुण्यातील १० ग्रॅम सोन्याची किंमत जाणून घ्या…

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६२,३२४ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ६७,९९० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६२,३२४ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ६७,९९० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६२,३२४ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ६७,९९० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६२,३२४ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ६७,९९० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत. 

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.