Gold-Silver Price Today:  महिन्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. आज शनिवारी बाजार उघडताच सोन्याच्या दरात घसरण नोंदवली गेली असून उच्चांकी किमतीवरून सोने आणि चांदी किंचित स्वस्त झाले आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंतच्या उच्चांकावरून स्वस्त किमतीत सोने खरेदीची ग्राहकांना आज संधी मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७१,८८० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७२,३९० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ९१,९२० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ९५,२१० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. 

Gold Silver Price 19 July 2024
Gold-Silver Price: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! चांदी झाली स्वस्त, किंमत पाहून बाजारात उसळली गर्दी   
Office Snacks Must Have Food
ऑफिसच्या डब्यात ‘हे’ तीन पदार्थ असायलाच हवेत! पोषणतज्ज्ञांनीच सांगितला, काम करताना ऊर्जा वाढवण्याचा सोपा फंडा
struggle makes us stronger a child doing struggle to sell raincoats in the pouring rain video will bring tears in your eyes
संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो! भर पावसात रेनकोट विकण्यासाठी चिमुकल्याची धडपड पाहून डोळ्यात पाणी येईल, VIDEO Viral
Rice lovers we this hack that claims it can help counter diabetes how it works and what can be the possible risks one can avoid must read
भातावर एक चमचा तूप घालून खाणे योग्य की अयोग्य? मधुमेही रुग्णांसाठी ठरेल का धोक्याची घंटा? लक्षात घ्या तज्ज्ञांचा सल्ला…
chaturang article, modern child rearing, Daily Struggles of Feeding child, child feeding, child rearing, marathi article
सांदीत सापडलेले.. : पूर्णब्रह्म!
Gangster Sham Lakhe beat up four children for extortion
गुंड शाम लाखे याची खंडणीसाठी चार मुलांना मारहाण; थरकाप उडवणाऱ्या व्हिडिओने खळबळ
Gold Silver Price 26 June 2024
Gold-Silver Price: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! चांदी झाली स्वस्त; तर मुंबई-पुण्यात १० ग्रॅम सोन्याचा भाव काय?
Improve Gut Health
आतड्यांमधील जमलेली घाण झपाट्याने काढून टाकतील ‘हे’ ५ पदार्थ? सेवनाची ‘ही’ पद्धत जाणून घ्या

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६५,७७१ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७१,७५० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,७७१ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७१,७५० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,७७१ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७१,७५० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,७७१ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,७५० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत. 

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.