Gold-Silver Price Today: सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी थोडी निराशाजनक बातमी आहे. कारण, अक्षय्य तृतीयेनंतर पुन्हा एकदा सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे. ऐन लगीन सराईत सोने आणि चांदीचे दर नवनवे उच्चांक गाठत आहेत. देशभरात सध्या लग्नांचा मोसम सुरू असून त्यामुळं सोने व चांदीच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे. त्याचा परिणाम किमतीवर झाला असून सराफा बाजारात सोन्याच्या सरासरी भावानं नवा उच्चांक गाठला आहे.

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७२,९९० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७२,३९० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ८५,०९० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८५,२४० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

Gold Silver Price
Gold-Silver Price: ग्राहक खूश! गगनाला स्पर्श करून खाली आला सोन्याचा भाव, १० ग्रॅमची किंमत जाणून घ्या…
gold silver price
Gold-Silver Price: ऐन मतदानाच्या दिवशी सोन्याच्या किमतीत मोठा फेरबदल, मुंबईतील १० ग्रॅमची किंमत ऐकून ग्राहक…
Gold Silver Price 30 May
Gold-Silver Price: ग्राहक आनंदी! सोन्याचा भाव कोसळला, १० ग्रॅमचा दर पाहून बाजारात गर्दी
Gold Silver Price 23 May
Gold-Silver Price: सोन्याचा भाव पाहून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद, १० ग्रॅमचा दर वाचून बाजारात गर्दी
Gold Silver Price
Gold-Silver Price: लोकसभेच्या निकालादिवशी सोन्याच्या दरात बदल; मुंबईतील १० ग्रॅमची किंमत आता…  
Gold Silver Price on 27 May
Gold-Silver Price: सोन्याचा भाव ऐकून बाजारात उडाली खळबळ; जाणून घ्या १० ग्रॅम सोन्याची किंमत
Gold Silver Price 8 June
Gold-Silver Price: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! सोने झाले स्वस्त; १० ग्रॅमचा दर पाहून बाजारात उसळली गर्दी
Gold Silver Price Today
Gold-Silver Price: चांदीच्या दरात ११ वर्षांत मोठी वाढ तर सोन्याचा भाव तीन आठवड्यांच्या उच्चांकावर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचा दर

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

  • मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६६,७८८ रुपये आहे.
  • मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ७२,८६० प्रति १० ग्रॅम आहे.
  • पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,७८८ रुपये आहे.
  • पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,८६० रुपये आहे.
  • नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,७८८ रुपये आहे.
  • नागपूर मध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,८६० रुपये इतका आहे.
  • नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,७८८ रुपये आहे.
  • नाशिकमध्ये प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,८६० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.

२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.

२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.

१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.

१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.