Gold-Silver Price Today: सध्या लग्नसराईचा काळ आहे, त्यामुळे आता सोने चांदी खरेदीसाठी लगबग सुरु आहे. आता सोने आणि चांदीने पुन्हा दरवाढीचा गिअर टाकला. गेल्या आठवड्याप्रमाणेच या आठवड्यात मौल्यावान धातूने जोरदार मुसंडी मारली. आज सराफा बाजारात चांदीने इतिहास रचला असून चांदीचा भाव मोठ्या उच्चाकांवर पोहोचला आहे. सोने-चांदी खरेदीच्या विचारात असाल, तर घराबाहेर पडण्याआधी तुमच्या शहरातील सोने-चांदीचे ताजे दर जाणून घ्या.

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७४,०६० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७३,१८० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ९१,३२० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८७,२५० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

Children put their mouths a bottle cap shocking video
पालकांनो मुलांकडे लक्ष द्या; खेळताना तोंडात अडकलं झाकण, चिमुकला कळवत राहिला अन् VIDEO चा शेवट पाहून येईल अंगावर काटा
Going out with a car in rainy season
पावसाळ्यात कार घेऊन बाहेर पडताय? ‘या’ टिप्स करा फॉलो, प्रवास होईल सुखकर
Can Betel Leaf Help Weight Loss
विड्याच्या पानात काळी मिरी, बडीशेप व मनुके घालून खाल्ल्याने झटपट होतो फॅट बर्न; पण दिवसभरात ‘या’च वेळी खावं, पाहा फायदे
Eating oily spicy food all the time Be careful
तेलकट, मसालेदार पदार्थ सतत खाता? वेळीच व्हा सावध, नाहीतर उद्भवतील अनेक समस्या
dry fruits in summer
रोज उन्हाळ्यात मूठभर सुका मेवा सेवनाने तुमच्या शरीरावर काय होईल परिणाम? सेवनापूर्वी वाचाच डाॅक्टरांचा सल्ला…
Home Made Puchka is made with Aloo and pani made with pomegranate watch this Unique pani puri watch viral video
VIDEO: बटाटयाच्या पुऱ्या अन् डाळींबाचे पाणी ; तुम्हाला खायला आवडेल का अशी टेस्टी पाणीपुरी?
unhygienic food
शिळे अन् अस्वच्छ अन्नपदार्थ खाल्ल्याने तुमच्या शरीरावर काय परिणाम होतील? डाॅक्टरांकडून जाणून घ्या…
diy summer skin problem home remedies for heat rash and prickly heat
उन्हाळ्यात त्वचेवरील खाज, घामोळे काही दिवसांत होतील गायब! फक्त आंघोळीपूर्वी लावा ‘या’ २ पानांची बारीक पेस्ट
शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६७,७६९ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७३,९३० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६७,७६९ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७३,९३० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६७,७६९ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७३,९३० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६७,७६९ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७३,९३० रुपये आहे.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत. 

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.