Gold-Silver Price Today: सोन्या चांदीच्या दरात सातत्यानं चढउतार उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कधी सोन्याच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळत आहे. आज सोमवारी सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळालं आहे. तर चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७१,७६० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७२,८८० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ८९,५७० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ९१,९३० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

Gold-Silver Price
Gold-Silver Price: अर्थसंकल्पाच्या दिवशी सोन्याच्या दरात बदल; मुंबईतील १० ग्रॅमची किंमत आता…  
Gold Silver Price Today
Gold-Silver Price: महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात बदल, मुंबई-पुण्यात १० ग्रॅमचा भाव काय?
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
Gold Silver Price on 13 June 2024
Gold-Silver Price: बाजारपेठेत सोन्याचे भाव गडगडले, मुंबई-पुण्यात १० ग्रॅमचा दर आता… 
Gold Silver Price on 7 July 2024
Gold-Silver Price: सोन्याचा भाव ऐकून बाजारात उडाली खळबळ; जाणून घ्या १० ग्रॅम सोन्याची किंमत 
Gold prices fall sharply in 24 hours know what is todays rates
सुवर्णवार्ता! सोन्याच्या दरात २४ तासांत मोठी घसरण; ‘हे’ आहेत आजचे दर…
Gold Silver Price on 9 July 2024
Gold-Silver Price: ग्राहक आनंदी! दरवाढीनंतर सोन्याच्या दरात घसरण, १० ग्रॅमची किंमत ऐकून होऊ लागली गर्दी
Gold Silver Price Today
Gold-Silver Price: सोन्याच्या दरात किंचित वाढ, जाणून घ्या मुंबई-पुण्यातील १० ग्रॅम सोन्याची किंमत

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६५,६६१ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७१,६३० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,६६१ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७१,६३० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,६६१ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७१,६३० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,६६१ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,६३० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत. 

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.