Gold-Silver Price Today:  सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आज शनिवारी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या दिवशी ग्राहकांना मौल्यवान धातूंनी मोठा दिलासा दिला. आज सोन्याच्या दरात किंचित घसरण झाल्याचे पाहायला मिळालं आहे. तर चांदीच्या दरात वाढ झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७१,८६० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७२,१६० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ८५,०७० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८४,८८० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

Why Gold Price High in Marathi
Gold Price High: सोन्याच्या किंमती इतक्या का वाढल्या आहेत? असं अचानक घडलंय तरी काय?
ankita walawalkar reveals marriage plans and talk about future husband
अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? कोकणात करणार…
Gold and silver prices
Gold Silver Rate : अचानक सोन्या चांदीचे दर घसरले! जाणून घ्या, किती रुपयांनी झाले स्वस्त?
Shreyovi Mehta
नऊ वर्षाची श्रेयोवी मेहता कशी ठरली ‘वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर’ पुरस्कार जिंकणारी भारतातील सर्वात तरुण मुलगी?
dominican republic citizenship
पैसे नाहीत म्हणून ‘या’ देशानं नागरिकत्वच काढलं विकायला; किंमत लावली १ कोटी ७० लाख!
grandchildren of Nitin Gadkari did sthapna of Pancharatna Bappa
नातवांनी मांडला गणपती, कौतुकाला आले गडकरी आजोबा…..एकाच घरात दोन….
20th September Rashi Bhavishya in marathi
२० सप्टेंबर पंचांग: अश्विनी नक्षत्रात कोणत्या राशींचे प्रश्न लागणार मार्गी? प्रेम, पद, पैशांचा मार्ग होणार मोकळा; वाचा तुमचे भविष्य
Ganesh Visarjan 2024
Ganesh Visarjan 2024: गणपती बाप्पाबरोबर चार लाखांच्या सोन्याच्या साखळीचेही विसर्जन; मग काय १० हजार लिटर पाणी उपसलं, अन्…

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६५,७५३ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७१,७३० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,७५३ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७१,७३० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,७५३ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७१,७३० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,७५३ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,७३० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत. 

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.