scorecardresearch

Premium

Gold-Silver Price on 25 February 2023: लग्नसराईच्या हंगामात सोन्याच्या दरात मोठी घट, चांदीची चकाकीही उतरली, वाचा आजचे भाव

उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

Gold Silver Price
आजचे सोन्या-चांदीचे दर. (Photo-Financialexpress)

Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५१,७०० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५१,८०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६८,३०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ६८,८०० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५१,७०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५६,५१० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,७०० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५६,५१० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,७०० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५६,५१० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,७०० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५६,४५० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६८३ रुपये आहे.

Gold Silver Price on 26 February 2024
Gold-Silver Price on 26 February 2024: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात बदल, आजचा भाव काय?
gold silver price
Gold-Silver Price on 23 February 2024: स्वस्त झालं रे…! सोन्याच्या भावात घसरण, खरेदीपूर्वी पाहा आजचे दर
Gold-Silver Price on 10 February
Gold-Silver Price on 10 February 2024: सोन्याच्या दरात घसरण तर चांदी महागली, जाणून घ्या आजचा भाव
Gold Silver Price on 7 February
Gold-Silver Price on 7 February 2024: सोन्याच्या दरात बदल, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या १० ग्रॅमचा भाव

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.

२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.

२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.

१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.

१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gold silver prices on saturday maharastra 25 february 2023 mumbai pune nagpur nashik new price pdb

First published on: 25-02-2023 at 09:05 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×