Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७०,९०० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७१,७९० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ८१,२६० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८२,४५० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६४,८७३ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ७०,७७० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६४,८७३ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७०,७७० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६४,८७३ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७०,७७० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ६४,८७३ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७०,७७० रुपये आहे.

Loksatta explained When will the crisis on orange groves be resolved
विश्लेषण: संत्र्याच्या बागांवरील संकट केव्हा दूर होणार?
Vegetables, expensive, price,
भाज्या महागल्या; वातावरण बदलाचा फटका
Smuggling, liquor, Goa, mango boxes,
आंब्याच्या पेट्यांमधून गोव्यातील मद्याची तस्करी; १२ लाखांचे विदेशी मद्य जप्त
Mumbai’s BMC urges citizens to avoid street food during summers here’s why you should be careful too
“उन्हाळ्यात रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाऊ नका”, BMC चे आवाहन; विक्रेत्यांसह ग्राहकांनी कशी बाळगावी सावधगिरी?
Article on Primary Education National Education Policy
या मुलांना पुन्हा पहिलीत बसण्याची संधी द्यायला हवी…
Porsche Teen's Blood Sample Thrown Into Dustbin
Pune Accident: रक्ताचे नमुने कचराकुंडीत; सदोष रक्त चाचणी निकाल बदलू शकते का? सलमान खानच्या हिट अ‍ॅण्ड रन केसमध्ये हायकोर्टात नेमके काय घडले होते?
Keep your pets fit and active indoors during the heatwave
तापमानाचा वाढला पारा, लाडक्या पाळीव प्राण्यांचे आरोग्य सांभाळा! उष्णतेच्या लाटेमुळे कुत्रा-मांजरही त्रासले, अशी घ्या त्यांची काळजी?
Estimated 17 to 19 percent increase in income for jewelry sellers
सोन्यातील तेजीचा असाही परिणाम; सराफांचे उत्पन्न १७ ते १९ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.

२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.

२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.

१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.

१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.