Gold-Silver Price Today:  सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आज गुरुवारी सोन्याच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळालं आहे. तर चांदीच्या दरातही बदल झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७२,१६० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६९,९४० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ८४,८८० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८०,८०० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

Gold and silver prices
Gold Silver Rate : अचानक सोन्या चांदीचे दर घसरले! जाणून घ्या, किती रुपयांनी झाले स्वस्त?
Shantanu Naidu ratan tata youngest friend
कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची…
Gold-Silver Price today 8 September 2024
Gold Silver Price : गणेशोत्सवानिमित्त सोनं खरेदीचा विचार करताय? मग पाहा तुमच्या शहरातील आजचा सोने-चांदीचा दर
Gold Silver Price Today in Marathi| Gold Silver Rate Today in Marathi
Gold Silver Price Today : सोने- चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ! जाणून घ्या तुमच्या शहरातील २२ कॅरेट सोन्याचा दर
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Gold prices decreased on Wednesday after Ganeshotsav
सुवर्णवार्ता… गणेशोत्सव संपताच सोन्याच्या दरात घसरण.. हे आहेत आजचे दर…
Gold-Silver Price
Gold-Silver Price: सोने घसरणीनंतर किमतींमध्ये झाले मोठे बदल, पाहा मुंबई-पुण्यात काय सुरुये १० ग्रॅमचा भाव 
Gold price Today
सोनं महागलं! दहा ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागणार इतके पैसे; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा दर

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६६,०२८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७२,०३० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,०२८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७२,०३० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,०२८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७२,०३० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,०२८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,०३० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत. 

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.