Gold-Silver Price Today: सोन्या चांदीच्या दरात सातत्यानं चढउतार उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कधी सोन्याच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळत आहे. आज मंगळवारी सोन्याच्या दरात किंचित घसरण झाल्याचे पाहायला मिळालं आहे. तर चांदीच्या दरात वाढ झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७१,७८० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७२,०८० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ८९,५८० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८९,५३० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

Gold-Silver Price
Gold-Silver Price: ग्राहकांसाठी आनंदाचा दिवस! सोने झाले स्वस्त, मुंबई-पुण्यातील १० ग्रॅम सोन्याचा भाव तपासा
Gold Silver Price on 24 June 2024
Gold-Silver Price: सोन्याच्या दराबाबत ग्राहकांसाठी आली आनंदाची बातमी! १० ग्रॅमची किंमत ऐकून बाजारात गर्दी
Gold Silver Price on 25 June 2024
Gold-Silver Price: सकाळ होताच सोन्याचे दर बदलले, जाणून घ्या मुंबई-पुण्यातील १० ग्रॅमचा दर
Gold Silver Price on 9 July 2024
Gold-Silver Price: ग्राहक आनंदी! दरवाढीनंतर सोन्याच्या दरात घसरण, १० ग्रॅमची किंमत ऐकून होऊ लागली गर्दी
Gold Silver Price 8 June
Gold-Silver Price: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! सोने झाले स्वस्त; १० ग्रॅमचा दर पाहून बाजारात उसळली गर्दी
masik rashifal july 2024 very lucky for 5 zodiac signs
जुलै महिना या ५ राशींसाठी ठरेल वरदान! मिळेल सुवर्णसंधी आणि राजवैभव
Gold-Silver Price
Gold-Silver Price: सोन्याच्या घसरणीला ब्रेक, गेल्या २४ तासांत ‘एवढा’ वाढला भाव, मुंबई-पुण्यातील १० ग्रॅमची किंमत पाहा
Gold Silver Price
Gold-Silver Price: घसरणीनंतर सोन्याचे दर कडाडले, पाहा मुंबई-पुण्यातील १० ग्रॅम सोन्याची किंमत

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६५,६७९ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७१,६५० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,६७९ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७१,६५० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,६७९ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७१,६५० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,६७९ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,६५० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत. 

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.