Gold-Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं चढउतार उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कधी सोन्याच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळत आहे. आज मंगळवारी जुलै महिन्याच्या दुसऱ्याच्या दिवशी सोन्याच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळालं आहे. तर चांदीच्या दरातही बदल झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७१,८५० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७१,७७० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ८९,७७० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८९,४६० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

kondhwa police arrested robbers
पुणे: कोंढव्यात दरोड्याच्या तयारीतील चोरट्यांची टोळी गजाआड; तीक्ष्ण शस्त्रे, दुचाकी जप्त
11th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
११ सप्टेंबर पंचांग : प्रीती योग कोणाच्या नशिबाचे उघडणार कुलूप? व्यवसायात लाभ तर मान-सन्मानात होईल वाढ; वाचा तुमचे भविष्य
Gold Silver Price
Gold-Silver Price: सोन्याचा भाव पाहून ग्राहकांना धक्का! जाणून घ्या मुंबई-पुण्यातील १० ग्रॅमची किंमत
Gold Silver Price
Gold-Silver Price: कमी झालेले सोन्याचे दर अचानक वाढले, मुंबई-पुण्यातील १० ग्रॅमची किंमत जाणून घ्या…
Gold Silver Price
Gold-Silver Price: बाजारपेठेत सोन्याचा किमतीचा भडका, मुंबई-पुण्यातील १० ग्रॅमचा दर पाहा
Gold Silver Price
Gold-Silver Price: रक्षाबंधनाच्या दिवशी सोन्याच्या किमतीत बदल, मुंबई-पुण्यातील १० ग्रॅमची किंमत ऐकून ग्राहक थक्क
Gold Silver Price
Gold-Silver Price: सोन्याच्या दराने बाजारपेठेत उडवली खळबळ, मुंबई-पुण्यातील १० ग्रॅमची किंमत वाचून फुटेल घाम
Gold Silver Price
Gold-Silver Price: स्वस्त झालेले सोने पुन्हा महागले; मुंबई-पुण्यातील १० ग्रॅम सोन्याची किंमत जाणून घ्या…

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६५,७४३ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७१,७२० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,७४३ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७१,७२० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,७४३ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७१,७२० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,७४३ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,७२० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत. 

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.