Gold-Silver Price Today: सराफा बाजारात पुन्हा एकदा सोन्या आणि चांदीची झळाळी वाढली आहे. सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीने मोठा पल्ला गाठल्यामुळे ग्राहकांचा खिसा जास्त कापला जात असून खरेदीवर जास्त किंमत मोजावी लागत आहे. अशा स्थितीत, सोने खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांना किंमतीची अचूक माहिती असणे आवश्यक आहे.

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७४,१२० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७४,४११ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ९३,५६० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ९३,२१५ रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

Gold Silver Price 30 May
Gold-Silver Price: ग्राहक आनंदी! सोन्याचा भाव कोसळला, १० ग्रॅमचा दर पाहून बाजारात गर्दी
Gold Silver Price 8 June
Gold-Silver Price: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! सोने झाले स्वस्त; १० ग्रॅमचा दर पाहून बाजारात उसळली गर्दी
Gold Silver Price
Gold-Silver Price: लोकसभेच्या निकालादिवशी सोन्याच्या दरात बदल; मुंबईतील १० ग्रॅमची किंमत आता…  
Gold Silver Price on 06 June
Gold-Silver Price: सोन्याच्या किमतीने केला कहर, १० ग्रॅमचा दर ऐकून बाजारात पसरली शांतता!
Gold Silver Price 1 June 2024
Gold-Silver Price: सोन्याचा १० ग्रॅमचा दर ऐकून ग्राहकांचा फुलेल चेहरा! भाव पाहून खरेदीसाठी मोठी गर्दी
Gold Silver Price on 13 June 2024
Gold-Silver Price: बाजारपेठेत सोन्याचे भाव गडगडले, मुंबई-पुण्यात १० ग्रॅमचा दर आता… 
puneri pati viral there is no love like father Emotional Slogan Written Behind puneri riksha Video
“आज पाहिलेली सगळ्यात भारी पुणेरी पाटी” रिक्षामागची पाटी पाहून व्हाल भावूक; पुण्यातला VIDEO व्हायरल
Gold Silver Price on 11 June 2024
Gold-Silver Price: सरकार स्थापन होताच सोन्याचे बदलले दर, मुंबई-पुण्यात १० ग्रॅमची किंमत आता…

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६७,८१५ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७३,९८० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६७,८१५ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७३,९८० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६७,८१५ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७३,९८० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६७,८१५ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७३,९८० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत. 

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.