Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७१,७९० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७१,५५० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ८२,४५० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८२,५०० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६५,६८८ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ७१,६६० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,६८८ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,६६० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,६८८ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,६६० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,६८८ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,६६० रुपये आहे.

Onion, price, wholesale,
कांद्याच्या दरात पुन्हा वाढ, घाऊकमध्ये प्रतिकिलो २९ रुपयांवर
robbery in builder's home, Builder s Trusted Couple Flees with 27 Lakh, 40 tola gold stealing in Nagpur, robbery news, Nagpur news,
तब्बल ४० तोळे दागिने व २७ लाखांच्या रोख रकमेवर डल्ला! मानलेला भाऊ व त्याच्या पत्नीने…
Porsche Teen's Blood Sample Thrown Into Dustbin
Pune Accident: रक्ताचे नमुने कचराकुंडीत; सदोष रक्त चाचणी निकाल बदलू शकते का? सलमान खानच्या हिट अ‍ॅण्ड रन केसमध्ये हायकोर्टात नेमके काय घडले होते?
Gold Silver Price on 28 May 2024
Gold-Silver Price: सोन्याच्या किमतीने बाजारात केला कहर, लोकांना फोडला घाम, १० ग्रॅमचा दर जाणून घ्या…
why Akshay Kumar wakes up 'two and a half hours' before his wife and kids
“…म्हणून मी पत्नी आणि मुलांच्या ‘अडीच तास’ आधी उठतो”, अक्षय कुमारने सांगितले त्याच्या या खास सवयी मागचे कारण, पाहा
Why do flamingos change their way 39 flamingos have died in plane crashes till now
फ्लेमिंगो पक्ष्यांचा मार्गबदल का?
gold silver price
Gold-Silver Price: ऐन मतदानाच्या दिवशी सोन्याच्या किमतीत मोठा फेरबदल, मुंबईतील १० ग्रॅमची किंमत ऐकून ग्राहक…
Risk of rain with strong winds how safe is a roof top restaurant Nagpur
वादळी वाऱ्यासह पावसाचा धोका, ‘रुफ टॉप रेस्टॉरन्ट’किती सुरक्षित ?

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.

२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.

२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.

१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.

१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.