Gold-Silver Price Today: सोन्या चांदीच्या दरात सातत्यानं चढउतार उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कधी सोन्याच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळत आहे. आज बुधवारी सोन्याच्या दरात किंचित वाढ झाल्याचे पाहायला मिळालं आहे. सोनं खरेदी करणं महाग झालं आहे. याचा मोठा फटका खरेदीदारांना बसत आहे.  चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७१,६०० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७१,२५० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ८८,९९० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८९,०५० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. 

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६५,५१४ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७१,४७० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,५१४ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७१,४७० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,५१४ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७१,४७० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,५१४ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,४७० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.