Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५९,३९० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५९,३८० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७२,०७० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७२,४२० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५४,४४१ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५९,३९० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,४४१ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,३९० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,४४१ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,३९० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,४४१ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,३९० रुपये आहे.

mumbai reports 3 thousand dog bite incidents in three years
श्वान दंशाच्या घटनांमध्ये वाढ; मुंबईत तीन वर्षांत ३ हजार श्वान चाव्याच्या घटना
Confusion in domestic market due to the decision to import milk powder maize edible oils
दूध पावडर, मका, खाद्यतेलांच्या आयातीच्या निर्णयाने देशांतर्गत बाजारात संभ्रमावस्था
does onion juice really grow hair Fast know here
कांद्याच्या रसामुळे केस खरचं लांब होतात का? येथे उत्तर जाणून घ्या
Mouse Jiggler Sacks People Job
एका ‘माउस जिगलर’ने हजारो लोकांच्या नोकऱ्या घालवल्या! आहे तरी काय हा प्रकार, कर्मचाऱ्यांची हुशारी कशी उलट फिरली?
vehicles vandalized reel marathi news
Video: पिंपरी- चिंचवडमध्ये रिल्स बनवत वाहनांची तोडफोड; दोन अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात
Decisions on petrol-diesel up to states Finance Minister appeal regarding bringing under GST
पेट्रोल-डिझेलबाबत निर्णय राज्यांच्या हाथी; जीएसटी कक्षेत आणण्याबाबत अर्थमंत्र्यांचे आवाहन
Loksatta explained When will the crisis on orange groves be resolved
विश्लेषण: संत्र्याच्या बागांवरील संकट केव्हा दूर होणार?
debt recovery marathi news
कर्जवसुली न्याय प्राधिकरण

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.

२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.

२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.

१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.

१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.