Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६२,३४० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६२,१३० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७१,७६० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७१,४८० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५७,०५३ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६२,२४० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,०५३ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,२४० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,०५३ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,२४० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,०५३ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,२४० रुपये आहे.

Gold Silver Price
Gold-Silver Price on 9 April 2024: गुढी पाडव्याच्या दिवशी सोनं महागलं; चांदीच्या दरातही वाढ, पाहा आजचा भाव
gold silver price
Gold-Silver Price on 5 April 2024: सोन्याच्या किमतीत विक्रमी उडी; चांदीही ८० हजारांच्या पार, जाणून घ्या आजचा भाव
Gold Silver Price
Gold-Silver Price on 1 April 2024: आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सोन्या-चांदीच्या भावात तेजी, वाचा आजचे दर
gold silver price
Gold-Silver Price on 28 March 2024: सोनं खरेदी करणाऱ्यांना पुन्हा झटका, दरात पुन्हा वाढ, मुंबई-पुण्यात १० ग्रॅमची किंमत किती?

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.

२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.

२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.

१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.

१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.