Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५२,७०० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५२,३५० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ७२,५०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७१,३०० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५२,७०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५७,४९० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,७०० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५७,४९० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,७०० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५७,४९० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,७३० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५७,५३० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ७२५ रुपये आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold silver prices on wednesday maharastra 25 january 2023 mumbai pune nagpur nashik new price pdb
First published on: 25-01-2023 at 09:28 IST