वृत्तसंस्था, नवी दिल्ली

मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे डिजिटल माध्यमातून कर्ज वितरणाच्या नावाखाली होणाऱ्या सायबर गुन्ह्यांचे वाढू लागलेले प्रमाण पाहता, अशा अवैध डिजिटल कर्ज वितरण ॲपच्या विरोधातील तक्रारी मागील आर्थिक वर्षात दुपटीने वाढून १,०६२ वर पोहोचल्याची माहिती सरकारने लोकसभेत दिली होती. या अवैध कर्ज वितरण ॲपला आळा घालण्यासाठी गूगल आणि ‘फेस’ यांनी संयुक्तपणे पुढाकार घेतला आहे.

Harassment Case Brijbhushan Sharan Singh
“मी गुन्हा केलाच नाही, तर गुन्ह्याची कबुली…”; महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या आरोपावर ब्रिजभूषण सिंह यांची प्रतिक्रिया
case of the missing keys Puri Jagannath temple Naveen Patnaik Odisha
‘एवढ्या’ दागिन्यांची सरकारच करतंय चोरी; पंतप्रधानांचा कुणावर आरोप?
arvind kejriwal
“ही तर यंत्रणेला लगावलेली चपराक”, सर्वोच्च न्यायालयात केजरीवालांच्या भाषणांचा संदर्भ देत ईडीने काय म्हटलं?
Ed Action Jharkhand
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराच्या घरी कोट्यवधींचं घबाड; काँग्रेसच्या दाव्याने प्रकरणात मोठा ट्विस्ट!
This is why experts warn against storing your toothbrush in the bathroom
तुम्ही तुमचा टूथब्रश कुठे ठेवता? बाथरूममध्ये टूथब्रश ठेवणाऱ्यांना तज्ज्ञांचा इशारा
Ed Action Jharkhand
मंत्र्यांच्या नोकराच्या घरात सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे ढीग पाहून अधिकारीही चक्रावले!
Women Manipur violence Update
Manipur Violence : “पीडित महिला पोलिसांच्या वाहनात बसल्या, पण…”; नग्न धिंडप्रकरणी सीबीआयच्या आरोपपत्रातून धक्कादायक खुलासे
Ravi Kishan DNA test,
रवी किशन यांच्या डीएनए चाचणीची मागणी न्यायालयाने फेटाळली

गूगल आणि फिनटेक असोसिएशन फॉर कन्झ्युमर एम्पॉवरमेंट (फेस) यांच्याकडून आता यासाठी संयुक्तपणे मोहीम राबविली जाणार आहे. ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्यांपासून नागरिकांचे संरक्षण करणे, विश्वासू डिजिटल पर्यावरण तयार करणे हे या मोहिमेमागील प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यातून कोणत्याही फसवणुकीला बळी न पडता नागरिक इंटरनेटचा वापर करू शकतील, असे वातावरण तयार केले जाणे अपेक्षित आहे. या मोहिमेत ‘फेस’कडून गूगलला मार्केट इंटेलिजन्सचे पाठबळ मिळणार आहे. त्यातून डिजिटल कर्ज वितरण करणाऱ्या अवैध ॲपचा शोध घेण्यात येणार आहे. प्ले स्टोअरच्या धोरणाशी सुसंगत नसलेल्या ॲपवर कारवाई केली जाणार आहे.

आणखी वाचा-दिवाळीपूर्वीच ‘या’ बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, एफडीवरील व्याजदरात केली वाढ

देशातील पारंपरिक कर्ज वितरण व्यवस्थेत डिजिटल कर्ज वितरण उद्योगाकडे दुर्लक्ष केले जाते. डिजिटल कर्ज वितरणात फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे कर्जदारांचा या उद्योगाबाबतचा दृष्टिकोन नकारात्मक होत आहे. त्यामुळे डिजिटल कर्ज वितरण उद्योगासाठी कठोर नियमावली आखण्याची आवश्यकता या उद्योगातून व्यक्त केली जात आहे. आता गूगल आणि फेस यांच्या संयुक्त प्रयत्नामुळे नागरिकांना सुरक्षित डिजिटल कर्ज ॲप्लिकेशनचा वापर करता येईल.

गूगलने अवैध डिजिटल कर्ज वितरण करणाऱ्या ॲपच्या विरोधात ठोस पावले उचलली आहेत. फसवणूक करणाऱ्या कर्ज वितरण ॲपला प्रतिबंध करण्यासाठी कठोर धोरण गूगलने लागू केले आहे. -सुगंधा सक्सेना, मुख्य कार्यकारी अधिकारी, ‘फेस’