Premium

५०० च्या नोटा बंद करण्याचा किंवा १०००च्या सुरू करण्याचा सरकारचा विचार नाही – शक्तिकांत दास

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ५०० रुपयांच्या नोटा काढण्याचा किंवा १००० रुपयांच्या नोटा पुन्हा चलनात आणण्याचा विचार करत नाहीये. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जनतेला अशा प्रकारच्या अटकळीत गुंतू नये, असे आवाहन केले आहे.

500 rupee notes
बाजारातून ८८ हजार कोटींच्या ५०० रुपयांच्या नोटा गायब

५०० आणि १००० रुपयांच्या नोटांबाबत RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मोठी घोषणा केली आहे. आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत त्यांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. ५०० च्या नोटा बंद होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बंद झालेल्या १००० रुपयांच्या नोटेची छपाई पुन्हा सुरू होणार नाही. सर्वसामान्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही. सध्या या ५०० रुपयांचं चलन बंद करण्याची रिझर्व्ह बँकेची कोणतीही योजना नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ५०० रुपयांच्या नोटा काढण्याचा किंवा १००० रुपयांच्या नोटा पुन्हा चलनात आणण्याचा विचार करत नाहीये. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जनतेला अशा प्रकारच्या अटकळीत गुंतू नये, असे आवाहन केले आहे. एमपीसीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

५०० रुपयांच्या नोटेबाबत काय योजना आहे?

सध्या ५०० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा आरबीआयचा कोणताही विचार नाही. अलीकडेच सरकारने २००० च्या गुलाबी नोटा चलनात आणल्या आहेत. त्यानंतर सुमारे ५० टक्के २००० च्या नोटा बँकांमध्ये जमा झाल्या आहेत, अशीही माहिती आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली आहे.

१००० रुपयांच्या नोटेबाबत RBI प्रमुख काय म्हणाले?

२००० रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतल्यापासून १००० रुपयांच्या नोटा परत चलनात आणण्याची लोकांमध्ये चर्चा सुरू होती. १००० रुपयांच्या नोटा पुन्हा बाजारात आणता येतील, असे लोकांना वाटले. मात्र, आरबीआय प्रमुखांनी या अफवांना पूर्णविराम दिला आहे. सध्या १००० रुपयांच्या नोटा परत आणण्याची कोणतीही योजना नाही. लोक बँकेत जाऊन २००० च्या नोटा सहज बदलू शकतात, घाई करण्याची गरज नाही, असंही ते म्हणालेत.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-06-2023 at 13:37 IST
Next Story
Repo Rate : सलग दुसऱ्यांदा रेपो दरात कोणताही बदल नाही, महागाईबाबत RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांची मोठी घोषणा