Mumbai Real Estate: ‘आमदनी अठन्नी और खर्चा रुपय्या’ ही हिंदीतली म्हण आपल्याला ठाऊकच आहे. आजपर्यंत असंख्य हिंदी चित्रपटांमध्ये या म्हणीचा वापर अडचण किंवा हेटाळणीसाठी केला गेला. काही तर चित्रपटच या नावाचे निघाले. पण सध्या मोठ्या संख्येनं मुंबईकर हेच करताना दिसत आहेत. CREDAI-MCHI या संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणात मुंबईकरांचं नियोजन आणि त्यातून कमाई कमी आणि खर्च जास्त हा होणारा परिणाम बहुसंख्य मुंबईकरांना सहन करावा लागत असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे मुंबईत चक्क ‘ब्रेन-ड्रेन’ची समस्या उद्भवतेय की काय अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे!

आता पाहूयात नेमकं मुंबईत असं घडतंय तरी काय! तर गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईत जागा आणि त्या जागांवर उभ्या राहणाऱ्या इमारतींमधील घरं वा कार्यालयं यांच्या किमती अगदी गगनाच्याही वर काही असेल तर तिथपर्यंत भिडल्यात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लाखोंमध्ये होणाऱ्या गोष्टी हळूहळू कालबाह्य होऊ लागल्या असून करोडोंचीच यत्र-तत्र-सर्वत्र चर्चा दिसते आहे. बरं या घरांमध्ये स्वत: राहणाऱ्यांचा काही प्रश्न नाही, पण अशा परिसरात एवढी महागडी घरं भाड्यानं देणारे घरमालक त्यावर भाडंही तसंच वसूल करणार हे साहजिकच. त्याचाच परिणाम मुंबईकरांची कमाई कमी आणि खर्च जास्त यात झाला आहे!

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

पगार किती आणि खर्च होतो किती!

CREDAI-MCHI च्या माहितीनुसार, ज्याला आपण ‘मुंबई’ म्हणतो अशा ठिकाणी घर भाड्यानं घेण्याचा साधारण खर्च वर्षाला ५ लाख १८ हजारांच्या आसपास जातो. मिंटनं दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईतल्या कनिष्ठ स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा सरासरी पगार वर्षाला ४ लाख ४९ हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे मुंबईतल्या घरांच्या किंमती सोडा, घरांची भाडीही इथल्या सामान्य मुंबईकराच्या पगारापेक्षा जास्त आहे! बंगळुरू आणि दिल्ली या दोन मेट्रोपोलिटन शहरांमध्ये मुंबईपेक्षा बरी परिस्थिती आहे.

CREDAI-MCHI च्या अहवालानुसार बंगळुरू व दिल्लीमध्ये एका 1BHK घरासाठीचं भाडं हे मुंबईतील दरांपेक्षा जवळपास निम्मं म्हणजे वर्षाला अनुक्रमे २ लाख ३२ हजार आणि २ लाख २९ हजार इतकं आहे. तर या शहरांमध्ये कर्मचाऱ्यांचा सरासरी पगार अनुक्रमे ४ लाख २९ हजार व ५ लाख २७ हजार इतका आहे.

Brain Drain: मुंबईला ‘ब्रेन ड्रेन’चा धोका; पण नक्की हा काय प्रकार आहे? यामुळे मुंबईवर काय परिणाम होऊ शकतो?

जास्त पगार असणाऱ्यांचीही स्थिती समाधानकारक नाही!

CREDAI-MCHI च्या अहवालानुसार, कनिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांप्रमाणेच मध्यम स्तरावरील पगाराच्या स्लॉटमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही परिस्थिती काही फारशी समाधानकारक नाही. वर्षाला १५ लाखांच्या आसपास पॅकेज असणारे मुंबईकर जवळपास त्यांच्या पगाराच्या निम्मी रक्कम २बीएचके घरावर खर्च करतात. ही रक्कम थोडीथोडकी नव्हे, तर थेट साडेसात लाखांच्या घरात जाते. त्या तुलनेत बंगळुरू आणि दिल्लीमध्ये याही स्तरावर परिस्थिती चांगली आहे. बंगळुरूत या स्तरावर सरासरी वार्षिक पगार १६ लाख ४५ हजारांच्या घरात तर घराच्या भाड्यावरचा खर्च ३ लाख ९० हजार आहे. त्याचवेळी दिल्लीत हे प्रमाण अनुक्रमे १४ लाख ७ हजार आणि ३ लाख ५५ हजार इतकं आहे.

उच्चपदस्थांच्या बाबतीत काय होतं?

या अहवालात जितकी व्यक्ती वरच्या स्तरावर काम करते, तेवढ्या खोल्या वाढतात असं एक निरीक्षण आहे. त्यामुळे मुंबईत गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या उच्चपदस्थांचा सरासरी वार्षिक पगार ३३ लाख ९५ हजारांच्या घरात असतो. त्याचवेळी ते मुंबईत ३ बीएचके घरावर १४ लाख ५ हजार रुपये खर्च करत असल्याचं आढळून आलं आहे. बंगळुरू आणि दिल्लीमध्ये घराच्या भाड्यासाठी खर्च होणारी रक्कम अनुक्रमे ६ लाख २५ हजार आणि ५ लाख ७८ हजार इतकी आहे.

रिअल इस्टेट क्षेत्रात पुण्याची यशस्वी वाटचाल

मुंबईला ‘ब्रेन ड्रेन’चा धोका!

दरम्यान, या सगळ्या भाडेवाढीमुळे मुंबईला ‘ब्रेन-ड्रेन’चा धोका निर्माण झाला आहे. घराची भाडी अव्वाच्या सव्वा पद्धतीने वाढल्यामुळे अनेक नोकरदार वर्ग मुंबईबाहेर परवडणाऱ्या शहरांमध्ये स्थलांतर करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे याचा परिणाम मुंबईतील कुशल मनुष्यबळ मुंबईबाहेर जात असल्याचं दिसू लागलं आहे. याचाच अर्थ, मुंबईला ‘ब्रेन-ड्रेन’ची समस्या नजीकच्या भविष्यकाळात भेडसावण्याची शक्यता आहे.

Story img Loader