e-Passport cost in India: पासपोर्ट हा एक सरकारी दस्तऐवज आहे, जो एखाद्या व्यक्तीला परदेशात प्रवास करण्याची परवानगी देतो. तो ओळख आणि राष्ट्रीयत्वाचा दस्तऐवज म्हणून वापरला जातो.
पासपोर्ट मिळविण्यासाठी एखाद्या व्यक्तीला त्या देशाचे नागरिक असणे आणि विशिष्ट वयोमर्यादा यांसारख्या पात्रतेच्या अटी पूर्ण कराव्या लागतात आणि त्याचबरोबर त्याच्या ओळखीचा पुरावा, पत्ता व जन्म प्रमाणपत्र यांसारखी कागदपत्रे जमा करावी लागतात.
आता भारतात ई-पासपोर्टची सुविधा सुरू करण्यात आली आहे. ई-पासपोर्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिक मायक्रोप्रोसेसर चिप असलेला पासपोर्ट, जो पासपोर्टधारकाची बायोमेट्रिक आणि वैयक्तिक माहिती संग्रहित करतो. ई-पासपोर्ट किंवा बायोमेट्रिक पासपोर्ट हा नेक्स्ट जनरेशन प्रवास दस्तऐवज आहे. यात बिल्ट-इन चिप असते, ज्यामुळे तुमच्या पासपोर्टमध्ये ओळखीसंदर्भात फसवूक होण्याचा धोका नसतो.
पासपोर्ट सेवांचे आधुनिकीकरण करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय प्रवासात सुरक्षा वाढवण्यासाठी भारत सरकारने ई-पासपोर्ट जारी करण्यास सुरुवात केली आहे. आता ई-पासपोर्ट मिळवणेदेखील सोपे झाले आहे. नियमित पासपोर्ट मिळविण्यासाठी दीर्घ कालावधी लागतो. मात्र, ई-पासपोर्टमुळे या प्रक्रियेस वेग आला आहे.
भारतात ई-पासपोर्टची सुविधा मे २०२५ पासून सुरू करण्यात आली. यामुळे भारतीय नागरिकांना आंतरराष्ट्रीय प्रवास करणे सोपे झाले आहे. तसेच, विदेशात वास्तव्य करणे, स्थानिक प्रशासानाकडून सुरक्षेची मागणी करणे आणि सुविधा मिळवणे सोपे झाले आहे.
आता हा ई-पासपोर्ट कुठे मिळवायचा आणि त्यासाठी कसा अर्ज करायचा हे जाणून घेऊ.
ई-पासपोर्ट मिळविण्यासाठी पासपोर्ट सेवा वेबसाइटला भेट द्या. त्यानंतर इ-पासपोर्ट अॅप्लिकेशन फॉर्म भरा. तुमचे पासपोर्ट सेवा केंद्र निवडा किंवा पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र निवडा.अपॉइंटमेंट शेड्यूल करा.तुमच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी आणि बायोमेट्रिक डेटा कलेक्शनसाठी पासपोर्ट सेवा केंद्र किंवा पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राला भेट द्या.
देशातील १३ शहरांमध्ये मे २०२५ पासून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, चंदीगढ, कोची, चेन्नई, लखनऊ, अहमदाबाद, हैदराबाद, कोलकाता या शहरांत ई-पासपोर्ट जारी केला जात आहे.
e-Passport काढण्यासाठी किती शुल्क आकारले जाते?
आता ई पासपोर्ट मिळवण्यासाठी किती शुल्क भरावे लागते, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर, ई-पासपोर्टची फी नियमित पासपोर्टइतकीच असते .
पासपोर्ट प्रकार | पृष्ठे | वैधता | शुल्क(सामान्य) | शुल्क (तत्काळ) |
सामान्य पासपोर्ट | ३६ | १० वर्षे | १,५०० | ३,५०० |
सामान्य पासपोर्ट | ६० | १० वर्षे | २,००० | ४,००० |
अल्पवयीन पासपोर्ट | ३६ | ५ वर्षे | १,००० | ३,००० |
ई-पासपोर्टमध्ये कोणती माहिती असते?
ई-पासपोर्ट सुरक्षिततेच्या दृष्टीने भारताचे सर्वात महत्वाचे पाऊल मानले जात आहे. पासपोर्टची सुविधा जलद व सुरक्षितपणे नागरिकांना मिळावी, यासाठी ई-पासपोर्टची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या पासपोर्टमध्ये बिल्ट इन चिप असते. या चिपमध्ये व्यक्तीची माहिती साठवली जाते. ही माहिती एका विशिष्ट कोडमध्ये तयार केलेली असते. त्यामुळे या कोडमधील माहिती कोणालाही सहजपणे वाचता येत नाही. त्यामुळे फसवणूक होण्याची तसेच ड्युप्लिकेट पासपोर्टची संख्या कमी होत आहे.
१. व्यक्तीचा फोटो
२. बायोमेट्रिक डेटा
३. पूर्ण नाव, लिंग, जन्मतारीख, पत्ता
४. पासपोर्ट जारी करणाऱ्या प्राधिकरणाची डिजिटल सही
५. युनिक पासपोर्ट आयडी
६. पासपोर्टचा वैधता कालावधी
ई-पासपोर्टमध्ये असलेल्या चिपमध्ये व्यक्तीची महत्वाची माहिती असते. यामध्ये जन्मतारीख, व्यक्तीचा फोटो, बोटांचे ठसे, फोटो, नाव, जन्मतारीख अशा गोष्टी सुरक्षितपणे साठवल्या जातात. हा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी, बेसिक अॅक्सेस कंट्रोल (BAC), पॅसिव्ह ऑथेंटिकेशन (PA) आणि एक्सटेंडेड अॅक्सेस कंट्रोल (EAC) सारख्या आंतरराष्ट्रीय सुरक्षा तंत्रांचा वापर करण्यात आला आहे.
ई-पासपोर्ट डाउनलोड कसा करायचा? ई-पासपोर्टचे स्टेटस कसे तपासायचे?
तुम्ही ई-पासपोर्ट स्वतः डाउनलोड करू शकत नाही, कारण ते एक फिजिकल डॉक्युमेंट आहे. त्यात चिप एम्बेड केलेली असते. आता ई-पासपोर्टचे स्टेटस कसे तपासायचे हे जाणून घेऊ…
१. पासपोर्ट सेवा स्टेटस ट्रॅकर वर जा.
२. तुमचा फाइल नंबर आणि जन्मतारीख भरा.
३. हे केल्यानंतर तुमच्या पासपोर्ट अर्जाचे रिअल-टाइम स्टेटस अपडेट्स दिसेल.