scorecardresearch

Premium

आज बदलली नाही, तर २ हजार रुपयांची नोट जाणार रद्दीत; RBI ने स्पष्टच सांगितलं

आरबीआयने या वर्षी १९ मे रोजी एक परिपत्रक जारी करून ३० सप्टेंबरपर्यंत २००० रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा करण्यास किंवा बदलण्यास सांगितले होते.

2000 Note Withdrawal
२००० रुपयांची नोट (संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता टीम

आज म्हणजेच ३० सप्टेंबर ही २ हजार रुपयांची नोट बँकेत जमा करण्याची किंवा इतर नोटांसोबत बदलण्याची शेवटची संधी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयने शुक्रवारी स्पष्ट केले की, १ ऑक्टोबरपासून २००० रुपयांच्या नोटेचे मूल्य शून्य होणार आहे. म्हणजे ते कागदाच्या तुकड्यापेक्षा अधिक काही राहणार नाही, अशी वृत्तसंस्था एएनआयने माहिती दिली आहे.

आरबीआयने या वर्षी १९ मे रोजी एक परिपत्रक जारी करून ३० सप्टेंबरपर्यंत २००० रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा करण्यास किंवा बदलण्यास सांगितले होते. यानंतरही २००० रुपयांची नोट कायदेशीर राहतील, असे त्यावेळी सांगण्यात आले होते.

2000 rupees note
२००० रुपयांच्या नोटेबाबत RBI गव्हर्नरांचे मोठे वक्तव्य, दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती
GST
सप्टेंबरमध्ये जीएसटी संकलन १० टक्क्यांनी वाढले, चालू आर्थिक वर्षात चौथ्यांदा १.६२ लाख कोटी रुपये केले पार
Central government, home loan, interest subsidy
गृहकर्ज व्याज अनुदानापोटी केंद्राची ६०,००० कोटींच्या खर्चाची योजना
Byju’s Layoff
बायजू दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; कर्जदारांना ९९४७ कोटी देण्यास तयार, नेमकी योजना काय?

हेही वाचाः मारुती सुझुकीला जीएसटी प्राधिकरणाकडून १३९.३ कोटी रुपयांची नोटीस; नेमकं प्रकरण काय?

नोटा बदलण्याची अंतिम तारीख वाढवण्यासाठी शनिवारी संध्याकाळपर्यंत एक परिपत्रक जारी केले जाऊ शकते. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, असंही आरबीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने माहिती मिळाली आहे.

हेही वाचाः कच्च्या तेलावर विंडफॉल कर वाढला, एटीएफ आणि डिझेलवरील निर्यात शुल्क केले कमी

२००० ची नोट २०१६ मध्ये आली होती

२००० रुपयांची नोट नोव्हेंबर २०१६ मध्ये बाजारात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या जागी नव्या पॅटर्नमध्ये ५०० आणि २००० रुपयांच्या नव्या नोटा जारी करण्यात आल्या. मात्र, २०१८-१९ पासून RBI ने २००० रुपयांच्या नोटांची छपाई थांबवली आहे. तर २०२१-२२ मध्ये ३८ कोटी २००० रुपयांच्या नोटा नष्ट झाल्या.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: If not changed today 2000 rupee note will become junk rbi made it clear vrd

First published on: 30-09-2023 at 13:23 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×