पीटीआय, मुंबई
बँकाच्या ठेवींमधील वाढ मंदावल्याने त्यांच्याकडून निधी उभारणीसाठी रोख्यांवर भर दिला जात आहे. चालू आर्थिक वर्षात बँका रोख्यांच्या माध्यमातून सुमारे १.३ लाख कोटी रुपयांचा निधी उभारतील, असा अंदाजा इक्राच्या ताज्या अहवालात मांडण्यात आला आहे.

पतमानांकन संस्था इक्राच्या अहवालानुसार, ठेवी आणि कर्ज यातील वाढीतील तफावत वाढत असताना बँकांकडून रोखे विक्रीच्या माध्यमातून निधी उभारणीस प्राधान्य देत आहेत. चालू आर्थिक वर्षात बँका रोख्यांच्या माध्यमातून १.२ लाख ते १.३ लाख कोटी रुपयांचा निधी उभारतील. आतापर्यंतची ही उच्चांकी निधी उभारणी असेल. यातील सुमारे ८५ टक्के रोखे विक्री सार्वजनिक क्षेत्रातील बँका करतील. रोखे बाजारपेठेत पायाभूत सुविधा रोख्यांना प्रामुख्याने पसंती दिली जात आहे. रोख तरलतेची समस्या बँकांसमोर आहे. कर्जातील वाढ सातत्याने वाढत जाऊन ती ठेवीतील वाढीपेक्षा जास्त झाली आहे. यामुळे बँकांना निधीसाठी इतर मार्गांचा अवलंब करावा लागत आहे.

swiggy IPO, share market,
विश्लेषण : ‘स्विगी’च्या समभागांसाठी बोली लावणे फायद्याचे की तोट्याचे?
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते…
SAR Televenture takes over Tikona for Rs 669 crores print eco news
‘एसएआर टेलीव्हेंचर’चा ६६९ कोटींच्या मोबदल्यात ‘तिकोना’वर ताबा
Bahujan samaj vidhan sabha election 2024
बहुजन समाजातील संधीसाधूपणावर उपाय काय?
Bangladesh Power Supply Alert
Bangladesh Power Supply Alert : अदानी पॉवरचा बांगलादेशला वीज खंडित करण्याचा इशारा; मोहम्मद युनूस सरकार थकीत वीज बिल भरणार?
Baroda BNP Paribas Mutual Fund, Prashant Pimple,
‘व्याजदर शिखरावर असताना दीर्घ मुदतीची रोखे गुंतवणूक योग्य’
diwali boost for vehicle sales in pune car buying rise during diwali
अबब! ५५ हजार…
New Home Investment, Tax Exemption,
करावे कर समाधान : नवीन घरातील गुंतवणूक आणि कर सवलत

हेही वाचा >>>Personal Loans : भारतात पर्सनल लोनच्या मागणीत प्रचंड वाढ! गुगल ट्रेंड काय सांगतोय? कोणत्या बँका देतात स्वस्तात कर्ज? वाचा सविस्तर

गेल्या आर्थिक वर्षात बँकांनी रोख्यांच्या माध्यमातून १ लाख कोटी रुपयांची उभारणी केली होती. त्याआधी आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये बँकांनी १.१ लाख कोटी रुपयांची उच्चांकी निधी उभारणी रोख्यांच्या माध्यमातून केली होती. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत बँकांनी रोख्यांच्या माध्यमातून ७६ हजार ७०० कोटी रुपये उभारले आहेत. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत त्यात २२५ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. खासगी बँकांकडून कर्ज-पत गुणोत्तर कमी करण्यावर भर दिला जात आहे. याचवेळी सावजनिक बँका रोख्यांच्या माध्यमातून निधी उभारणी करण्याक़डे मोठ्या प्रमाणात वळत आहेत, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

रोख्यांच्या माध्यमातून निधी उभारणी वाढल्याने खासगी बँकांचे कर्ज-पत गुणोत्तर आणखी खराब होणार आहे. याचवेळी सार्वजनिक क्षेत्रातील बँका पायाभूत सुविधा रोख्यांच्या माध्यमातून निधी उभारणी करीत असून, त्यात आणखी वाढीला वाव आहे.- सचिन सचदेवा, प्रमुख, वित्तीय मानांकन विभाग, इक्रा