scorecardresearch

Premium

प्राप्तिकर ‘ई-अपील’ योजना लवकरच

ई-अपील योजनेची अंमलबजावणी अधिक कार्यक्षम, सुलभ आणि उत्तरदायी करप्रणालीच्या दिशेने एक प्रगतीशील पाऊल ठरणार आहे.

Income Tax eAppeal scheme
प्राप्तिकर ‘ई-अपील’ योजना लवकरच (image – file photo/indian express)

पीटीआय, नवी दिल्ली

प्राप्तिकर विभागाने ई-अपील योजनेच्या अंमलबजावणीच्या दिशेने पुढचे पाऊल टाकताना, मंगळवारी ती अधिसूचित केली. कर प्रशासनाच्या नोटीसा व अन्य कारवाईबाबत ऑनलाइन अपील दाखल करण्याची मुभा देण्यासह, त्याची प्रक्रिया या योजनेतून सुनिश्चित केली जाणार आहे.

ई-अपील योजनेची अंमलबजावणी अधिक कार्यक्षम, सुलभ आणि उत्तरदायी करप्रणालीच्या दिशेने एक प्रगतीशील पाऊल ठरणार आहे. वादाच्या प्रकरणांत करदाते जलद निकालाची अपेक्षा यातून शक्य बनेल, अशी योजनेबद्दल सार्वत्रिक स्वागतपर प्रतिक्रिया आहे.

harideep singh nijjar
पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!
Parineeti troll
“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…
sharad pawar narendra modi (1)
“पंतप्रधान मोदींचं ‘ते’ विधान क्लेशदायक”, शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका; दिले १९९३ च्या घडामोडींचे दाखले!
Pankaja Munde Narendra Modi
“हा तुमचा पक्षाला इशारा आहे का?”, पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या, “मी त्यांना…”

हेही वाचा – २०१३ पेक्षा आजचा भारत वेगळा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देशावर सर्वात जास्त प्रभाव : मॉर्गन स्टॅन्ले

प्राप्तिकर विभागाचे सहआयुक्त (अपील) यांच्यासमोर दाखल झालेल्या किंवा त्यांना सोपवल्या गेलेल्या किंवा हस्तांतरित केलेल्या अपीलांचा निपटारा ते ‘ई-अपील योजना, २०२३’ अंतर्गत तरतुदींच्या माध्यमातून करतील. कर-प्रशासनाच्या मूल्यांकन आदेशाविरुद्ध करदात्याने अपील दाखल केले अशा अपील प्रकरणांमध्ये या योजनेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे वैयक्तिक सुनावणीचीही तरतूद आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-05-2023 at 17:56 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×