मुंबई: सोनेतारण कर्ज क्षेत्रातील ठेवी न स्वीकारणारी बँकेतर वित्ती य कंपनी असलेल्या इंडेल मनी लिमिटेडने प्रत्येकी १,००० रुपये दर्शनी मूल्याच्या सुरक्षित अपरिवर्तनीय रोख्यांची (एनसीडी) पाचवी सार्वजनिक विक्री जाहीर केली आहे. विक्री २१ ऑक्टोबरपासून खुली झाली असनू, ती ४ नोव्हेंबर २०२४ रोजी, लवकर भरणा पूर्ण झाल्यास विक्री लवकर बंद करण्याच्या पर्यायासह बंद होईल.

हेही वाचा >>> वस्त्रोद्योगात ९५ हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित; पीएलआय’मुळे परदेशी गुंतवणूकदारांतही वाढते आकर्षण

या रोखेविक्रीतून १५० कोटी रुपयांपर्यंत निधी उभारला जाणे कंपनीला अपेक्षित आहे. हा निधी कंपनीच्या आगामी कर्ज आणि वित्तपुरवठ्यासाठी वापरात येईल आणि कंपनीच्या कर्जावरील मुद्दल आणि व्याजाची परतफेड यासाठी वापरला जाईल. कंपनीच्या एकूण कर्ज वितरणात ९१.८२ वाटा सोने तारण कर्जाचा असून, देशभरात ३२४ शाखांद्वारे कंपनी कार्यरत आहे.

हेही वाचा >>> Adar Poonawalla Net Worth : करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनमध्ये अदर पूनावालांची हजार कोटींची गुंतवणूक, एकूण किती संपत्तीचे आहेत मालक?

या रोखे विक्रीचे व्यवस्थापन व्हिव्हरो फायनान्शियल सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीकडून पाहिले जात आहे. प्रस्तावित रोख्यांना क्रिसिल रेटिंग्जने बीबीबी /स्थिर मानांकन बहाल केले आहे. ३६६ दिवसांपासून ६६ महिन्यांपर्यंत मुदतीचे पूर्णपणे सुरक्षित एनसीडीमध्ये वेगवेगळ्या मालिकांसाठी किमान अर्ज रक्कम १०,००० रुपये आहे. मालिका सात अंतर्गत ६६ महिन्यांत गुतंवणूक दुप्पट करणाऱ्या या रोख्यांवर प्रभावी व्याजाचा दर वार्षिक १३.४४ टक्क्यांच्या घरात जाणारा आहे. या एनसीडीचे व्यवहार डिमॅट स्वरूपात होतील आणि त्यांची मुंबई शेअर बाजारात सूचिबद्धता प्रस्तावित आहे.

Story img Loader