नवी दिल्ली : सरलेल्या मे महिन्यात देशाची व्यापारी मालाची निर्यात ९ टक्क्यांनी वधारून ३८.१३ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे, जी मागील वर्षीच्या याच महिन्यात ३४.९५ अब्ज डॉलर होती, अशी शुक्रवारी वाणिज्य मंत्रालयाने माहिती दिली. यंदा अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स, औषधी, कापड आणि प्लास्टिक यांसारख्या क्षेत्रातील सुदृढ वाढीमुळे जागतिक आर्थिक अनिश्चितता असूनही निर्यातीत वाढ होण्यास मदत झाली. मात्र खनिज तेलाच्या आयातीतील वाढीमुळे एकूण आयातदेखील ७.७ टक्क्यांनी वधारून ६१.६१ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात ती ५७.४८ अब्ज डॉलर होती.

हेही वाचा >>> घाऊक महागाई दर १५ महिन्यांच्या उच्चांकी; मे महिन्यात २.६१ टक्क्यांवर; किरकोळ महागाईच्या विपरीत वाट

tesla shareholders okay ceo elon musk s rs 4 67 lakh crore pay package
मस्क यांच्या ४४.९ अब्ज डॉलर वेतनमानास ७७ टक्के भागधारकांची मंजुरी
Sharad Pawar and Ajit Pawar
अजित पवारांसाठी परतीचे दार बंद झाले का? शरद पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले, “सवाल…”
india wholesale inflation rate at 15 month high in may 2024
घाऊक महागाई दर १५ महिन्यांच्या उच्चांकी; मे महिन्यात २.६१ टक्क्यांवर; किरकोळ महागाईच्या विपरीत वाट
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
What Kiran mane Said About Ketki Chitale?
केतकी चितळेला किरण मानेंचा सवाल, “अभिमानाने ‘चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण’ जात सांगणारी ताई आता हिंदू..”
representation of women in the lok sabha after general elections 2024
अग्रलेख: राणीचे राज्य…
paytm layoff
Paytm Layoff : अन् कर्मचारी ढसाढसा रडत म्हणाला, “हवं तर मी कमी पगारावर काम करेन”, पुढे काय झालं?
Ressesion
“२००८ पेक्षाही मोठ्या मंदीची शक्यता”; सध्याच्या आर्थिक स्थितीवरून अर्थतज्ज्ञांचा इशारा!

मे महिन्यात तेलाची आयात २८ टक्क्यांनी वाढून २० अब्ज डॉलर झाली आहे. २०२४-२५ एप्रिल-मे दरम्यान ती एकत्रित २४.४ टक्क्यांनी वाढून ३६.४ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, या वर्षीच्या मे महिन्यात सोन्याची आयात किरकोळ घसरून ३.३३ अब्ज डॉलरवर मर्यादित राहिली. जी गेल्या वर्षी याच महिन्यात ३.६९ अब्ज डॉलर होती.

देशाच्या आयात-निर्यातीतील तफावत अर्थात व्यापार तुटीने २३.७८ अब्ज डॉलरची पातळी गाठल्याचे वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीने स्पष्ट केले. विद्यमान आर्थिक वर्षातील (२०२४-२५) एप्रिल-मे या दोन महिन्यांच्या कालावधीत निर्यात ५.१ टक्क्यांनी वाढून ७३.१२ अब्ज डॉलर झाली आणि त्या तुलनेत आयात ८.८९ टक्क्यांनी वाढून ११६ अब्ज डॉलर झाली आहे. मात्र सरलेला मे महिना हा निर्यातीच्या दृष्टीने उत्कृष्ट ठरला आहे आणि हा कल पुढेही कायम राहील, अशी आशा वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी व्यक्त केली.