केंद्र सरकारने जानेवारी-मार्च २०२३ तिमाहीचे GDP आकडे जाहीर केले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, भारताचा GDP ६.१ टक्क्यांच्या वेगाने वाढला आहे. २०२२-२३ मध्ये GDP ७.२ टक्के होता, जो मागील आर्थिक वर्षात ९.१ टक्क्यांनी वाढला होता. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये पहिल्या तिमाहीत १३.१ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ६.२ टक्के आणि तिसर्‍या तिमाहीत ४.५ टक्के अर्थव्यवस्था वाढली. जानेवारी-मार्च २०२३ तिमाहीत जीडीपी वाढीचा दर ४.९ ते ५.५ टक्के राहण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला होता. पण अंदाजापेक्षा चांगले काम झाले आहे. कृषी क्षेत्रातील ताकद आणि देशांतर्गत मागणीत झालेली वाढ यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला आधार मिळाला आहे.

अमेरिका पहिल्यांदाच डिफॉल्ट होण्याच्या मार्गावर

पाश्चिमात्य देशांमध्ये मंदीच्या भीतीने भारत जागतिक अर्थव्यवस्थेसाठी चांगला पर्याय म्हणून उदयास आला आहे. युरोपमधील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश जर्मनी मंदीच्या गर्तेत अडकला आहे, तर अमेरिका पहिल्यांदाच डिफॉल्ट होण्याच्या मार्गावर आहे. जागतिक बँक आणि IMF सारख्या संस्था म्हणतात की, भारतात मंदीची शक्यता कमी आहे. जीडीपीचे आकडे याची खातरजमा करतात. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत आर्थिक विकास दर ४.५ टक्के होता. २०२१-२२ च्या जानेवारी-मार्च तिमाहीत GDP वाढीचा दर चार टक्के होता. आकडेवारीनुसार, संपूर्ण आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये आर्थिक विकास दर ७.२ टक्के होता. मागील आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये तो ९.१ टक्के होते. जेव्हा जेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत चर्चा होते, तेव्हा नेहमीच जीडीपी हा एक शब्द ऐकायला मिळतो. हे कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोजमाप करण्यासाठी वापरले जाते. भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात शक्तिशाली अर्थव्यवस्थांमध्ये समाविष्ट आहे. भारताची अर्थव्यवस्था अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनीनंतर जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था मानली जाते.

international monetary fund praises india for maintaining fiscal discipline in election year
निवडणूक वर्षातही भारताकडून वित्तीय शिस्त कायम; आंतरराष्ट्रीय़ नाणेनिधीकडून कौतुक; आघाडीच्या देशांमध्ये स्थान कायम राहणार
Upsc ची तयारी: अर्थव्यवस्था : भारतातील बेरोजगारीचे अंत:प्रवाह
economic confidence china japan company
जर्मन कंपन्या चीनमधून पुन्हा जपानमध्ये का जात आहेत?
apec climate center predict india will receive above normal monsoon rainfall
विश्लेषण : ला-निनामुळे यंदाच्या पावसाळयात ‘आबादाणी’ होईल?

जीडीपीचे आकडे महत्त्वाचे का आहेत?

कोणत्याही देशासाठी त्याचे जीडीपीचे आकडे फार महत्त्वाचे असतात. त्यातून त्या देशाच्या अर्थव्यवस्थेची प्रगती दिसून येते. म्हणजेच देशाची अर्थव्यवस्था कशी चालते आणि आर्थिक घडामोडी कशा आहेत. कोणताही देश या आकडेवारीच्या आधारे आपली धोरणे ठरवतो.