भारत सध्या ३,७५० अब्ज डॉलर GDP सह जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. परंतु परचेसिंग पॉवर पॅरिटीनुसार, सध्या भारत ही जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था आहे. त्या यादीत पहिल्या क्रमांकावर अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर चीन, तिसऱ्या क्रमांकावर जपान आणि चौथ्या क्रमांकावर जर्मनी हे देश आहेत. विशेष म्हणजे वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सनुसार या यादीत अमेरिका नव्हे तर चीन ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्याचं दाखवण्यात आलं आहे. क्रयशक्तीच्या समानतेच्या बाबतीत चीन ३०.३ ट्रिलियन डॉलरसह जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून समोर आली आहे. तसेच अमेरिका २५.४ ट्रिलियन डॉलर्ससह जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. आता ही क्रयशक्ती समानता (PPP) म्हणजे काय यासंदर्भात सविस्तर जाणून घेणार आहोत.

भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था

परचेसिंग पॉवर पॅरिटीच्या माहितीनुसार, भारत ११.८ ट्रिलियन डॉलरसह जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. भारताच्या पुढे फक्त अमेरिका आणि चीन आहेत. या यादीत जपान चौथ्या क्रमांकावर आहे. तसेच रशिया ५.३२ ट्रिलियन डॉलरसह पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. या यादीत जर्मनी सहाव्या स्थानावर आहे.

China is aggressive again after Taiwans war drills What are chances of war
तैवानच्या युद्धसरावाने चीन पुन्हा आक्रमक? युद्धाची शक्यता किती?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Industrial production rises to six month high of 5 2 in November print eco news
देशाची कारखानदारी रूळावर येत असल्याची सुचिन्हे!  नोव्हेंबरमध्ये औद्योगिक उत्पादन सहा महिन्यांच्या उच्चांकी  ५.२ टक्क्यांवर
ruhcir sharma
२०२५ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कशी असेल?
Markets uneasy over concerns of GDP slowdown print eco news
‘जीडीपी’ मंदावण्याच्या चिंतेने बाजारात अस्वस्थता
India GDP growth rate
भारताचा जीडीपी विकासदर मंदावण्याचा अंदाज चिंताजनक, पण धक्कादायक नाही! असे का?
Image of Indian economy graphics or related visuals
भारताचा GDP यंदा ६.४ टक्क्यांवर घसरण्याची शक्यता : सरकारचा अंदाज
Maharashtra once again on top in country for foreign direct investment.
विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा अव्वल

हेही वाचाः Money Mantra : तुम्हालाही सेवानिवृत्तीनंतरची आर्थिक चिंता सतावत आहे का? ‘या’ ५ प्रकारे नियोजन करा

क्रयशक्ती समानता म्हणजे नेमके काय?

देशांमधील आर्थिक उत्पादकता आणि राहणीमानाची तुलना करण्यासाठी क्रयशक्ती समानता (purchasing power parity) ही एक लोकप्रिय व्यापक आर्थिक मेट्रिक पद्धत वापरली जाते. पीपीपी (purchasing power parity) हा एक आर्थिक सिद्धांत आहे, ज्याचा वापर विविध देशांच्या चलनांची तुलना करण्यासाठी केला जातो. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास PPP हा सैद्धांतिक विनिमय दर आहे, ज्यावर तुम्ही कोणत्याही देशात समान वस्तू आणि सेवा खरेदी करू शकता. हे देशाच्या चलनाच्या क्रयशक्तीबद्दल माहिती देते. उदाहरणार्थ, भारतात १००० रुपयांना खरेदी करता येणाऱ्या मालासाठीच अमेरिकेत किती डॉलर मोजावे लागतील किंवा इतर कोणत्याही देशात किती चलन भरावे लागेल याला दाखवणे म्हणजेच ही क्रयशक्ती समानता आहे.

हेही वाचाः Money Mantra : मुलांच्या भविष्यासाठी उत्तम योजना, ५००० रुपयांच्या SIP मधून १० वर्षांत किती निधी उभाराल? जाणून घ्या

इंडोनेशिया ७वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था

क्रयशक्ती समानतेच्या बाबतीत इंडोनेशिया ही सातव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. या यादीत फ्रान्स नवव्या, यूके दहाव्या, कॅनडा १६ व्या आणि ऑस्ट्रेलिया १९ व्या स्थानावर आहे.

Story img Loader