scorecardresearch

Premium

महागाईतून काही अंशी दिलासा; जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई दरात घट

देशात महागाईच्या भडक्यामुळे सर्वसामान्यांची होरपळ सुरू आहे. मात्र, महागाईचा पारा काही अंशी कमी होऊ लागल्याचे समोर आले आहे.

india's retail inflation rate, india's retail inflation rate declined
महागाईतून काही अंशी दिलासा; जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई दरात घट (संग्रहित छायाचित्र)

नवी दिल्ली : देशात महागाईच्या भडक्यामुळे सर्वसामान्यांची होरपळ सुरू आहे. मात्र, महागाईचा पारा काही अंशी कमी होऊ लागल्याचे समोर आले आहे. किरकोळ महागाईच्या दरात जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये घसरण नोंदविण्यात आली आहे. मात्र, डाळींच्या वाढत्या भावामुळे चालू महिन्यात महागाईचा पारा कायम राहील, असा विश्लेषकांचा अंदाज आहे.

किरकोळ किंमत निर्देशांकांवर आधारिक किरकोळ महागाईचा दर जुलै महिन्यात ७.४४ टक्क्यांवर पोहोचला होता. ही १५ महिन्यांतील उच्चांकी पातळी होती. त्यावेळी खाद्यवस्तूंच्या भावातील वाढीमुळे महागाईचा भडका उडाला होता. भाज्या आणि खाद्यवस्तूंच्या महागाईचा जुलैमध्ये ११.५ टक्के या तीन वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. आता किरकोळ महागाईच्या दरात ऑगस्ट महिन्यात घसरण होऊ तो ६.८३ टक्क्यांवर आला आहे.

Danger from electric wires on footpaths Inexcusable negligence of the Municipal Corporation after entrusting the work to the contractors navi Mumbai
पदपथांवरील विद्युत तारांमुळे धोका; कंत्राटदारांकडे काम सोपवल्यावर महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष
farmers agitation causes massive traffic jam in nashik city
शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे नाशिककरांची कोंडी; वन जमिनींच्या प्रश्नावर मंगळवारी मुंबईत बैठक
Raju Shetty news
केंद्र सरकारची उसाच्या एफआरपीची वाढ तोकडी; राजू शेट्टी यांची टीका
Allegation of the farmers association of abuse of onion producers
कांदा उत्पादकांची कुचेष्टा केल्याचा शेतकरी संघटनेचा आरोप; निर्यातबंदी उठवल्याच्या अधिसूचनेची प्रतीक्षाच

हेही वाचा : निफ्टी ऐतिहासिक उच्चांकी पातळीपासून माघारी; ‘सेन्सेक्स’चे सलग आठवे सत्र तेजीचे!

सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जुलैच्या तुलनेत खाद्यवस्तूंच्या महागाईचा दर कमी झाला आहे. हा दर जुलैमध्ये ११.५१ टक्के होता आणि ऑगस्टमध्ये तो ९.९४ टक्क्यांवर आला आहे. ग्रामीण भागातील महागाईचा दर ७.०२ टक्के आणि शहरी भागातील महागाईचा दर ६.५९ टक्के आहे.

हेही वाचा : गेल्या चार वर्षांत ५.२ कोटी तरुणांना नोकऱ्या मिळाल्या, SBIच्या अहवालातून मोठा खुलासा

व्याजदर वाढीची टांगती तलवार?

रिझर्व्ह बँकेने किरकोळ महागाई दराचे ४ टक्क्यांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यात अधिक दोन टक्के आणि उणे दोन टक्के दर गृहित धरला जातो. ऑगस्टमधील महागाईचा दर हा रिझर्व्ह बँकेच्या उद्दिष्टापेक्षा अधिक आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि पतधोरण समितीचे सदस्य जयंत वर्मा यांनी नुकताच महागाईवरून इशारा दिला होता. त्यामुळे महागाईचा दर वाढत राहिल्यास व्याजदर वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India retail inflation eased to 6 83 percent in august from 7 44 percent in july print eco news css

First published on: 13-09-2023 at 11:32 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×