नवी दिल्ली : देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाने (जीडीपी) जानेवारी ते मार्च या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत ७.८ टक्क्यांची वाढ दर्शविली, असे सांख्यिकी मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीने स्पष्ट केले. या आधीच्या तिसऱ्या तिमाहीतील ८.६ टक्क्यांच्या तुलनेत त्यात लक्षणीय घसरण झाली असली तरी बहुतांश अर्थविश्लेषकांच्या अपेक्षानुरूप ही आकडेवारी आली आहे. उल्लेखनीय म्हणजे शुक्रवारीच जाहीर झालेल्या दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार, २०२३-२४ या संपूर्ण वर्षाचा ‘जीडीपी’ मात्र, मागील वर्षातील ७.६ टक्क्यांच्या तुलनेत दमदार ८.२ टक्क्यांपर्यंत सुधारण्यात आला आहे.

या आधीच्या म्हणजे २०२२-२३ या संपूर्ण आर्थिक वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर ७ टक्के होता. सरलेल्या आर्थिक वर्षात आधीच्या तिन्ही तिमाहीत विकासदर ८ टक्क्यांहून अधिक राहिला आहे. ऑक्टोबर-डिसेंबर २०२३ तिमाहीत तो ८.६ टक्के, त्या आधीच्या जुलै-सप्टेंबर २०२३ तिमाहीत ८.१ टक्के, तर एप्रिल ते जून २०२३ तिमाहीत तो ८.२ टक्के असा होता आणि तर आता जानेवारी-मार्च अंतिम तिमाहीत ७.८ टक्के नोंदवला गेला आहे.

mutual fund sip flows crosses to rs 21000 crore in june
‘एसआयपी’तून जूनमध्ये २१,००० कोटींचा ओघ
32 thousand crores fundraising through ipo in six months boom in ipo
विश्लेषण : सहा महिन्यांत ३२ हजार कोटींची निधी उभारणी… आयपीओ बाजारातील तेजी कुठवर?
Mumbai serial blasts case Abu Salem gets relief from special TADA court
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : अबू सालेमला विशेष टाडा न्यायालयाचा दिलासा
iran election iran to hold runoff election between reformist masoud pezeshkian and hard liner saeed jalili
इराणमध्ये अध्यक्षपदासाठी फेरमतदान; सुधारणावादी मसूद पेझेश्कियाँ आघाडीवर, पण बहुमताची हुलकावणी
gross liabilities of government increased to rs 171 78 lakh crore at the end of march 2024
सरकारचे दायित्व १७१ लाख कोटींवर; मार्चअखेरीस संपलेल्या तिमाहीत ३.४ टक्क्यांची वाढ
readers comments on loksatta editorial readers reaction on loksatta articles
लोकमानस : जीएसटी कक्षेत आणल्यास इंधन स्वस्त होईल
cm eknath shinde ordered district collectors to Pay compensation to farmers by june 30
पाच दिवसांत नुकसानभरपाई द्या ; शेतकऱ्यांना मदतीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हा प्रशासनाला आदेश
Direct tax collection increased by 21 percent to Rs 4 62 lakh crore
प्रत्यक्ष कर संकलन २१ टक्क्यांनी वाढून ४.६२ लाख कोटींवर

हेही वाचा >>> भारताची वित्तीय तूट १६.५४ लाख कोटींवर; सरत्या आर्थिक वर्षातील स्थिती; जीडीपीच्या ५.६ टक्क्यांवर

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने फेब्रुवारीमध्ये जाहीर केलेल्या पहिल्या आगाऊ अंदाजात, आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी ‘जीडीपी’ वाढीचे अनुमान ७.७ टक्के होते. नव्याने जाहीर आकडेवारीनुसार, वास्तविक जीडीपी किंवा स्थिर किंमतींवर आधारीत जीडीपी, २०२३-२४ मध्ये १७८.८२ लाख कोटी रुपयांची पातळी गाठण्याचे अनुमान आहे. पहिल्या सुधारित अंदाजात हा आकडा १६०.७१ लाख कोटी रुपये होता. नाममात्र जीडीपी किंवा सध्याच्या किमतींनुसार जीडीपी २०२३-२४ मध्ये २९५.३६ लाख कोटी रुपयांची पातळी गाठेल असा अंदाज आहे. २०२२-२३ मधील २६९.५० लाख कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात ९.६ टक्के वाढ दर्शविली जाईल, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> पुणेस्थित ॲडेप्ट फ्ल्युडाईनचे योकोगावाकडून संपादन

उत्पादन क्षेत्राची सरस कामगिरी

वास्तविक सकल मूल्यवर्धन (जीव्हीए) आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ७.२ टक्क्यांनी वाढले आहे. मुख्यत: उत्पादन क्षेत्राच्या सरस कामगिरीमुळे हे शक्य झाले आहे. निर्मिती क्षेत्राचे सकल मूल्यवर्धन २०२२-२३ मधील २.२ टक्क्यांनी गडगडले होता, त्या तुलनेत २०२३-२४ मध्ये ९.९ टक्क्यांनी वाढले आहे. जानेवारी ते मार्च २०२४ तिमाहीत उत्पादन क्षेत्रातील सकल मूल्यवर्धन ८.९ टक्क्यांपर्यंत वाढले आहे जे वर्षापूर्वी ०.९ टक्क्यांवर होते. खाण आणि उत्खनन क्षेत्रातही मागील वर्षातील १.९ टक्क्यांच्या तुलनेत सरलेल्या आर्थिक वर्षात ७.१ टक्के दराने सकल मूल्यवर्धन दिसून आले.

पाच ट्रिलियन डॉलरचे लक्ष्य समीप

वार्षिक ८.२ टक्क्यांच्या उमद्या वाढीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार आता ३.५ ट्रिलियन (लाख कोटी) डॉलरपर्यंत नेले आणि ५ ट्रिलियन डॉलरचे लक्ष्य गाठण्याचा टप्पा हा आता पुढील काही वर्षांच्या अंतरावर असल्याचे अधोरेखित केले गेले आहे.

जगात सर्वात वेगवान वाढ

सरलेल्या आर्थिक वर्षात जानेवारी ते मार्च ही शेवटची तिमाही सोडल्यास आधीच्या तिन्ही तिमाहीत भारताचा विकासदर ८ टक्क्यांहून अधिक राहिला आहे. हे पाहता जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताचे स्थान कायम आहे. भारताच्या खालोखाल चीनने, २०२३-२४ च्या पहिल्या तीन महिन्यांत ५.३ टक्के दराने अर्थव्यवस्थेत वाढ नोंदवली आहे.