मुंबई : देशाची चालू खात्यावरील तूट सप्टेंबरअखेर तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) ४.४ टक्क्यांपर्यंत विस्तारली आहे. आधीच्या म्हणजे एप्रिल ते जून या तिमाहीत जीडीपीच्या तुलनेत २.२ टक्क्यांच्या घरात असलेल्या तुटीत तिमाहीगणिक दुपटीने विस्तार झाला आहे, असे रिझव्‍‌र्ह बँकेने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले.

एकीकडे देशाची निर्यात वाढत असली तरी आयातीत त्यापेक्षा अधिक वाढ होत आहे आणि या दोहोतील तफावत म्हणजे व्यापार तूट महिनागणिक वाढत चालली आहे. परिणामी देशाच्या चालू खात्यावरील तूट विद्यमान आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या दुसऱ्या तिमाहीत ३६.४ अब्ज डॉलरवर (जीडीपीच्या ४.४ टक्के) पोहोचली आहे. ती पहिल्या तिमाहीत १८.२ अब्ज डॉलर इतकी होती. तर वर्षभरापूर्वी याच तिमाहीत तूट ९.७ अब्ज डॉलर अर्थात जीडीपीच्या तुलनेत १.३ टक्के होती.

infosys profit rs 7969 crore in fourth quarter
इन्फोसिसचा तिमाही नफा ७,९६९ कोटींवर; मार्चअखेर तिमाहीत ३० टक्क्यांची दमदार वाढ
March 2024, March 2024 Records Hottest Temperatures, March 2024 Records Hottest in 175 Years, hottes march 2024 globally, Global Average Temperatures Up by 1.35°C, heat, summer march, summer season
यंदाचा मार्च आजवरचा सर्वांत उष्ण; पश्चिमी झंझावाताचा भारताला दिलासा
Panvel Municipal Corporation
एका दिवसांत तीन कोटींहून अधिक कर जमा, पनवेल महापालिकेच्या तिजोरीत आतापर्यंत ३३३ कोटी रुपये
The central government fiscal deficit reached Rs 15 lakh crore at the end of February
वित्तीय तूट १५ लाख कोटींवर; फेब्रुवारीअखेर वार्षिक उद्दिष्टाच्या तुलनेत ८६.५ टक्क्यांवर

फेब्रुवारी २०२२च्या उत्तरार्धात रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर जागतिक बाजारात वस्तू आणि सेवांच्या किमती वाढल्याने चालू खात्यातील तुटीमध्ये तीव्र स्वरूपाची वाढ होणे अपेक्षित होते. जुलै-सप्टेंबरमध्ये भारताचा एकूण आयात खर्च सुमारे २०० अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. या तिमाहीत वस्तू-व्यापार तूट ८३.५ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. आधीच्या म्हणजे एप्रिल ते जून तिमाहीत ती ६३ अब्ज डॉलरवर मर्यादित होती. वस्तू व्यापार तुटीतील लक्षणीय वाढीच्या परिणामी चालू खात्यावरील तुटीत मोठी वाढ झाली आहे.

सेवा क्षेत्रामुळे दिलासा : सेवा क्षेत्राच्या निर्यातीने तूट कमी राखण्यास मदत केली. वार्षिक आधारावर सॉफ्टवेअर, वित्तीय सेवा आणि पर्यटनाच्या क्षेत्रातील निर्यातीने सरासरी ३०.२ टक्के वाढ नोंदवली. सरलेल्या तिमाहीत या क्षेत्राचे ३४.४ अब्ज डॉलर योगदान राहिले, ते गेल्या वर्षी म्हणजेच जुलै-सप्टेंबर २०२१ या तिमाहीत २५.६ अब्ज डॉलर राहिले होते.