नवी दिल्ली : देशातील औद्योगिक उत्पादनाचा वेग सरलेल्या जुलै महिन्यात ४.८ टक्क्यांवर घसरला. खाणकाम आणि निर्मिती क्षेत्राची खराब कामगिरी याला कारणीभूत ठरल्याचे गुरूवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीतून समोर आले. देशातील कारखानदारीतील सक्रियतेचे मापन असलेला औद्योगिक उत्पादन निर्देशांक गुरूवारी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केला. यानुसार, जुलैमध्ये औद्योगिक उत्पादनाचा वाढीचा दर ४.८ टक्के नोंदवला गेला. गेल्या वर्षी जुलै महिन्यात हा दर ६.२ टक्के होता.

हेही वाचा >>>  नवी मुंबईत पर्यावरणप्रिय हरित बांधकांना चालना; ‘सीआयआय-आयजीबीसी’च्या ३० व्या केंद्राचे कार्यान्वयन

rbi governor shaktikant das on repo rate
व्याजदरांबाबत RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचं मोठं विधान; म्हणाले, “महागाई आटोक्यात येतेय, पण…”
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
tupperware
डबे, बाटल्या तयार करणारी लोकप्रिय ‘टपरवेअर’ कंपनी झाली दिवाळखोर; कारण काय? या कंपनीचे नक्की काय चुकले?
Ulhas bapat modi cji meeting
PM Modi : “पंतप्रधानांनी सरन्यायाधीशांच्या घरी जाणं मोठी चूक”, घटनातज्ज्ञ उल्हास बापटांनी सांगितले नियम
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?
Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…
Jitendra J Jadhav as new head of Aeronautical Development Agency
Jitendra Jadhav: मराठी माणूस देशासाठी लढाऊ विमानांची निर्मिती करणार, कोण आहेत शास्त्रज्ञ जितेंद्र जाधव?
india e vehicles market estimated annual sales to reach 30 to 40 lakhs
ई-वाहनांची वार्षिक विक्री ३० ते ४० लाखांवर पोहोचण्याचा अंदाज

निर्मिती क्षेत्राच्या वाढीचा दर यंदाच्या जुलैमध्ये ४.६ टक्के राहिला असून, गेल्या वर्षी याच महिन्यात तो ५.३ टक्के होता. खाणकाम क्षेत्राचा वाढीचा वेग ३.७ टक्के असून, गेल्या वर्षी जुलैमध्ये तो १०.७ टक्के होता. वीजनिर्मिती क्षेत्राची कामगिरीही गेल्या वर्षीच्या जुलैमधील ८ टक्क्यांवरून, यंदाच्या जुलैमध्ये ७.९ टक्के अशी होती. पायाभूत आणि बांधकाम सामग्री क्षेत्रानेही गेल्या वर्षीच्या १२.६ टक्क्यांच्या वाढदराच्या तुलनेत यंदाच्या जुलैमध्ये ४.९ टक्क्यांपर्यंत घसरण दर्शविली आहे. औद्योगिक उत्पादनात एप्रिल ते जुलै या कालावधीत ५.२ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा वाढीचा दर ५.१ टक्के होता.