मुंबई : चीनमध्ये करोनाचा वाढता प्रकोप आणि देशांतर्गत पातळीवर करोनाच्या संभाव्य प्रादुर्भावाच्या भीतीमुळे भांडवली बाजारात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या परिणामी सकाळच्या सत्रात सकारात्मक पातळीवर खुल्या झालेल्या बाजारात दिवसअखेर प्रमुख निर्देशांक १ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

आशियाई बाजारातील कमकुवत कल आणि देशांतर्गत आघाडीवर निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसीच्या समभागात गुंतवणूकदारांनी जोरदार विक्रीचा मारा केला. त्यातून दिवसअखेर सेन्सेक्स ६३५.०५ अंशांनी म्हणजेच १.०३ टक्क्यांनी घसरून  ६१,०६७.२४ पातळीवर गडगडला. दिवसभरातील सत्रात त्याने ७६३.९१ अंश गमावत ६१ हजारांची पातळीही मोडली होती. सेन्सेक्स ६०,९३८.३८ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्शून सावरताना दिसून आला. दुसरीकडे निफ्टीमध्ये १८६.२० अंशांची (१.०१ टक्के) घसरण झाली आणि तो १८,१९९.१० पातळीवर स्थिरावला.

india s industrial production growth reached to 4 8 percent in july 2024
खाणकाम, निर्मिती क्षेत्रात मरगळ कायम; औद्योगिक उत्पादनाचा वेग जुलैमध्ये मंदावला
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
betel leaves expensive, betel leaves,
विड्याची पाने का महागली ? जाणून घ्या, अतिवृष्टी, संततधारेचा परिणाम काय?
Why will families migrate from tiger protected areas
वाघांच्या संरक्षित क्षेत्रांतील कुटुंबांचे स्थलांतरण का होणार? समस्या काय? आव्हाने कोणती?
tanishq and de beers collaboration to boost India s natural diamond jewellery market
डी बीयर्सशी भागीदारीतून हिऱ्यांच्या ग्राहकांमध्ये दुपटीने वाढीचे तनिष्कचे लक्ष्य
nse marahti news
जागतिक सकारात्मकतेने निर्देशांक तेजी कायम, ‘सेन्सेक्स’ ८२,३६५ च्या विक्रमी शिखरावर
Only 14 thousand 839 applications in 117 days for allotment of 2030 houses of Mumbai Mandal of MHADA Mumbai news
सोडतपूर्व प्रक्रियेला १५ दिवसांची मुदतवाढ ? म्हाडाकडे ११७ दिवसांमध्ये केवळ १४ हजार ८३९ अर्ज
Mumbai, Capital Markets, Stock Indices, Sensex, Nifty, Federal Reserve, Jerome Powell, Jackson Hole Meeting, Domestic Institutional Investors, Foreign Institutional Investors,
तेजीवाल्यांची पकड घट्ट; ‘सेन्सेक्स’मध्ये शतकी वाढ

मंदीवाल्यांनी बाजारावर पकड अधिक घट्ट केली आहे. अमेरिकेच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाची आकडेवारी (जीडीपी) लवकरच जाहीर होणार असून त्याआधीच वॉल स्ट्रीटवर गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा अवलंबत नफावसुलीला प्राधान्य दिले. करोनाची नव्याने प्रादुर्भावाची शक्यता निर्माण झाल्याने औषध निर्माण आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्र वगळता सर्वच क्षेत्रांनी घसरण अनुभवली, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

Photos: ओसाड शहरे, औषधांसाठी स्पर्धा, प्लास्टिकमध्ये गुंडाळेली बाळं, PPE किटमध्ये रिक्षावाले अन्… चीनमध्ये करोनामुळे हाहाकार

सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या इंडसइंड बँक, बजाज फिनसव्‍‌र्ह, मारुती, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा मोटर्स, अ‍ॅक्सिस बँक, स्टेट बँक आणि कोटक महिंद्रा बँकेच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराने दिलेल्या माहितीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) मंगळवारच्या सत्रात ४५५.९४ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची खरेदी केली.

धक्कादायक! चीनमध्ये एका दिवसात ३ कोटी ७० लाख करोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले; जिनपिंग मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

आरोग्यनिगा कंपन्यांचे समभाग तेजीत

मुंबई : शेजारील राष्ट्र चीनमध्ये वाढलेला करोनाचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे देशात पुन्हा करोना साथीच्या भीतीने डोके वर काढल्याने देशांतर्गत भांडवली बाजारात बुधवारच्या सत्रात आरोग्य सेवेशी निगडित कंपन्यांचे समभाग तेजीत व्यवहार करत होते. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी देशातील कोविड-१९ परिस्थितीचा आढावा घेतला.

मुंबई शेअर बाजारात थायरोकेअर टेक्नॉलॉजीच्या समभागाने १४.८५ टक्क्यांची उसळी घेत तो ९०.५० रुपयांनी वधारून ७००.१० रुपयांवर स्थिरावला. त्यापाठोपाठ  आयओएल केमिकल्स आणि फार्मास्युटिकल्सचे समभाग १४.१६ टक्क्यांनी, विजया डायग्नोस्टिकचा समभाग ११.७४ टक्के आणि पॅनेशिया बायोटेकचा समभाग ९.५० टक्क्यांनी वधारला. तसेच, ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स ७.७६ टक्के, मेट्रोपोलिस हेल्थकेअर ६.९४ टक्के, डॉ. लाल पॅथलॅब्स ६.२३ टक्के तेजीत होता. मुंबई शेअर बाजारातील आरोग्यनिगा क्षेत्रातील कंपन्यांचा निर्देशांक २.२५ टक्क्यांनी वधारला.