मुंबई : खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या इंडसइंड बँकेला सप्टेंबरअखेर दुसऱ्या तिमाहीत १,३३१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला असून त्यात वार्षिक तुलनेत ४० टक्क्यांची घसरण झाली आहे. त्याचे प्रतिकूल पडसाद शुक्रवारी कंपनीच्या समभागावर शुक्रवारी उमटले. बुडीत कर्जामध्ये लक्षणीय वाढ झाली असून सप्टेंबर तिमाहीत एकूण बुडीत कर्जाचे प्रमाण वर्षभरापूर्वीच्या १.९३ टक्क्यांवरून सप्टेंबर २०२४ अखेर २.११ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. तर निव्वळ बुडीत कर्जाचे प्रमाण (नेट एनपीए) ०.६४ टक्क्यांवर पोहोचले आहे. जे मागील वर्षी ०.५७ टक्के राहिले होते. या कारणाने बँकेच्या तरतुदीत दुपटीने वाढ होऊन, ती आता १,८२० कोटी रुपयांवर पोहोचली आहे, गेल्यावर्षी ती ९७४ कोटी राहिली होती. याबरोबरच बँकेचा परिचालन खर्चदेखील वाढल्याने त्याचा नफ्यावर विपरीत परिणाम दिसून आला. थकलेली कर्जे ही मुख्यत: सूक्ष्मवित्त अर्थात मायक्रोफायनान्स संस्थांच्या माध्यमातून वितरित केली गेली होती, असे दिसून येते.

हेही वाचा >>> Gold Silver Rate Today : ग्राहकांना दिलासा! दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचा भाव काय?

sensex drops 663 point nifty ends below 24200
‘मुद्रा’ कर्जांची मर्यादा दुपटीने वाढून २० लाखांवर
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
ratan tata wealth ratan tata rs 10000 crore wealth ratan tata net worth 2024
Ratan Tata Wealth : रतन टाटांची दहा हजार कोटींची संपत्ती; लाडक्या टिटोसाठीही हिस्सा राखला
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 Updates : अमेरिकेच्या निवडणुकीत सहा भारतीयांची एन्ट्री; श्री ठाणेदार मिशिगनमधून विजयी!
Apple exports iPhone
Make in India : ६ अब्ज डॉलर्सच्या ‘आयफोन्स’ची चीन नाही, भारतातून निर्यात
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…

शुक्रवारच्या सत्रात इंडसइंड बँकेच्या समभागामध्ये जवळपास १९ टक्क्यांची म्हणजेच प्रत्येकी २३७.३५ रुपयांची घसरण झाली आणि तो १,०४१.५५ रुपयांवर बंद झाला. दिवसभरात, समभागाने १९.८२ टक्क्यांनी घसरण नोंदवत १,०२५.५० रुपयांची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी गाठली होती. परिणामी, एका सत्रात बँकेच्या बाजार भांडवल १८,४८९.३९ कोटी रुपयांनी घटले आहे. सध्याच्या बँकेच्या समभागाच्या बाजारभावानुसार, तिचे ८१,१३६ कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे. मौल्यवान सूचीतून गळती सप्टेंबर तिमाहीतील कमकुवत कमाईमुळे इंडसइंड बँक ही बाजार भांडवलानुरूप आघाडीच्या १० बँकांच्या सूचीतून बाहेर पडली आहे. शुक्रवारच्या सत्रात बँकेचा समभाग सर्वाधिक घसरल्याने ती या मौल्यवान सूचीत १२ व्या स्थानावर घसरली आहे. आघाडीच्या दहा बँकांमध्ये कॅनरा बँक, आयडीबीआय बँक आणि युनियन बँकेला समावेश झाला आहे. १३.२५ लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलासह एचडीएफसी बँक सूचीत आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ आयसीआयसीआय बँक (८.८१ लाख कोटी), स्टेट बँक ६.९७ लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलसह तिसऱ्या स्थानी आहे. त्यापाठोपाठ ॲक्सिस बँक चौथ्या स्थानी आणि त्यापुढे अनुक्रमे कोटक महिंद्र बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, कॅनरा बँक, आयडीबीआय बँक आणि युनियन बँक यांचे स्थान आहे.