नवी दिल्ली

सरलेल्या नोव्हेंबर २०२४ मध्ये सणासुदीच्या मागणीला साजेशी वस्तू-निर्मिती वाढल्याचा सुपरिणाम म्हणजे, देशाच्या औद्योगिक उत्पादन वाढीचा दर ५.२ टक्के असा सहा महिन्यांच्या उच्चांकी नोंदवला गेला, असे शुक्रवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीने सूचित केले.

Chandrapur District Bank recruitment case interviews due to fear of administrator appointment
प्रशासक नियुक्तीच्या भीतीपोटी युद्धपातळीवर मुलाखती, चंद्रपूर जिल्हा बँक नोकरभरती प्रकरण
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Advocate Pralhad Kokare Elected Chairman and CA Yashwant Kasar Vice-Chairman of Cosmos Cooperative Bank
कॉसमॉस बँकेच्या अध्यक्षपदी प्रल्हाद कोकरे, उपाध्यक्षपदी यशवंत कासार
Pimpri chinchwad Municipal corporation employees son becomes lieutenant at age 22
पिंपरी : महापालिका कर्मचाऱ्याचा मुलगा बनला लष्करी अधिकारी, सर्व स्तरातून कौतुक
GST department arrested two brothers in Solapur for evading Rs 10 83 crore GST
सोलापुरात दोघा व्यापारी बंधूंनी १०.८३ कोटींचा जीएसटी बुडविला, जीएसटी विभागाकडून अटकेची कारवाई
Seizure and attachment action against 3000 properties for non-payment of property tax
मालमत्ता कर थकबाकीदारांच्या दारात आता बॅण्डवादन
Sensex retreats below 78 thousand due to selling pressure
विक्रीच्या माऱ्याने सेन्सेक्सची ७८ हजारांखाली पीछेहाट
chandrashekhar bawankule reacts on valmik karad case and supriya sule statement
वाल्मिक कराड प्रकरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं प्रकरणावर लक्ष; दोषी आढळल्यास कारवाई अटळ, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, औद्योगिक उत्पादन निर्देशांकात (आयआयपी) नोव्हेंबर २०२३ मधील २.५ टक्के वाढीच्या तुलनेत, यंदाच्या नोव्हेंबरमध्ये त्यापेक्षा दुपटीहून अधिक अशी ५.२ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. मे २०२४ मध्ये ६.३ टक्के असा या आधीचा उच्चांकी विकासदर नोंदवण्यात आला होता. त्यानंतर त्याला घरघर लागली आणि जूनमध्ये तो ४.९ टक्के आणि जुलै २०२४ मध्ये ५ टक्के दराने नोंदविला गेला आहे. वस्तुतः मे महिन्यानंतर प्रथमच आयआयपी वाढ ५ टक्क्यांपेक्षा अधिक नोंदवली गेली आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये आयआयपी वाढ अवघी ०.१ टक्के होती, तर सप्टेंबरमध्ये ३.१ टक्के आणि ऑक्टोबर २०२४ मध्ये त्यात ३.७ टक्के वाढ झाली
देशातील कारखानदारीचे आरोग्यमान दर्शविणारा प्रमुख निर्देशांक असलेल्या आयआयपीमध्ये एप्रिल ते नोव्हेंबर २०२४ या १० महिन्यांमध्ये एकत्रित वाढ ४.१ टक्के राहिली आहे, जी मागील वर्षीच्या याच कालावधीत ६.५ टक्के होती, असे आकडेवारीवरून दिसून येते.

हेही वाचा >>>‘मर्सिडीज बेंझ’कडून दोन लाख मोटारींची विक्री; ‘मर्सिडीज बेंझ’कडून दोन लाख मोटारींच्या विक्रीचा टप्पा सर

देशांतर्गत सकल उत्पादनांत अर्थात जीडीपीमध्ये १७ टक्के योगदान राखणाऱ्या वस्तू-निर्मिती क्षेत्रात सरलेल्या नोव्हेंबरमध्ये ५.८ टक्के वाढ झाली, जी गेल्या वर्षीच्या १.३ टक्के होती. आकडेवारीनुसार, खाण उत्पादनातील वाढ नोव्हेंबरमध्ये १.९ टक्के अशी निराशाजनक राहिली, जी मागील वर्षीच्या याच कालावधीत ७ टक्के होती. वीजनिर्मितीची वाढ नोव्हेंबर २०२३ मधील ५.८ टक्क्यांच्या तुलनेत यंदा घटून ४.४ टक्के अशी होती. भांडवली वस्तूंच्या क्षेत्राची वाढ नोव्हेंबर २०२४ मध्ये ९ टक्क्यांची राहिली, जी आधीच्या वर्षाच्या तुलनेत १.१ टक्क्यांनी कमी होती.
सणोत्सवी मागणीनुसार, ग्राहकोपयोगी टिकाऊ (किंवा इलेक्ट्रॉनिक्स) वस्तूंच्या उत्पादनात १३.१ टक्क्यांनी वाढ झाली. मात्र ही वाढदेखील नोव्हेंबर २०२३ च्या तुलनेत ४.८ टक्क्यांनी कमी आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार, पायाभूत सुविधा/बांधकाम वस्तूंमध्ये नोव्हेंबर २०२४ मध्ये १० टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली, जी मागील वर्षीच्या तुलनेत १.५ टक्क्यांनी जास्त आहे. प्राथमिक वस्तूंच्या उत्पादनात नोव्हेंबर २०२४ मध्ये २.७ टक्के वाढ झाली आहे जी वर्षापूर्वीच्या काळात ८.४ टक्क्यांवर होती.

Story img Loader