देवदत्त धनोकर

आर्थिक नियोजन करताना ‘स्मार्ट उद्दिष्ट’ कशी लिहावीत याची माहिती आपण मागील लेखात घेतली. या लेखात आपण महागाईवाढीमुळे भविष्यात किती रकमेची आवश्यकता भासेल आणि त्यासाठी आपल्याला आज किती बचत / गुंतवणूक करावी लागेल याची माहिती घेऊया.

IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
Investment Opportunities in the Capital Goods Sector Top Companies
गुंतवणूक संधीचे क्षेत्र आणि न दिसणारे व्यवसाय: भांडवली वस्तू
Transfer of a railway official for answering RTI queries Mumbai
माहिती अधिकाराचे उत्तर दिल्याने, रेल्वे अधिकाऱ्याची बदली
Nagpur, RTI Activist, Alleges, Factory Blast case, Torn Application, Directorate of Industrial Safety and Health Management,
सोलार कंपनीतील स्फोट प्रकरण : कारवाईबाबत माहिती मागितली तर अर्जच फाडला; माहिती अधिकार कार्यकर्त्याचा दावा

महागाईवाढीमुळे आपल्याला भविष्यात मोठी रक्कम लागते ती नक्की किती असू शकते याचा अंदाज आपल्याला चक्रवाढ पद्धतीचा वापर करून निश्चित करता येतो. व्यवहारातील उदाहरणाच्या मदतीने हा मुद्दा अधिक स्पष्ट होईल.समीर आणि अपूर्वा यांना त्यांच्या पाच वर्षाच्या मुलीच्या लग्नासाठी किती खर्च होईल हे जाणून घ्यायचे आहे. समीर आणि अपूर्वा त्यांच्या जीवनशैलीप्रमाणे त्यांची मुलगी सारिका हिच्या लग्नात २५ लाखांचा खर्च करू इच्छितात. काही गृहीतकाच्या आधारे भविष्यातील खर्च निश्चित करता येईल. गृहीतक – लग्नाचे वय २४, महागाईवाढीचा दर ७ टक्के.

चक्रवाढ पद्धतीने आपण खर्च निश्चित करूया.

(आजचा खर्च P = २५ लाख, कालावधी N = १९ वर्ष, महागाईवाढीचा दर I = ७%.)
भविष्यातील खर्चाचे सूत्र : F = P ( १ I /१००) ^N
F = २५,००,००० ( १ ७/१०० ) ^१९
F = ९०,४१,३१९

म्हणजेच सारिकाचे वयाच्या २५ व्या वर्षी लग्नाचा अंदाजित खर्च ९०. ४१ लाख रुपये असेल.
याच पद्धतीने आपण विविध आर्थिक उद्दिष्टांसाठी भविष्यातील आवश्यक रक्कम निश्चित करू शकतो.
नोंद – सेवानिवृत्तीचे नियोजन करताना आपल्याला विविध गृहीतकांच्या मदतीने नियोजन करायचे असते याकरिता तज्ज्ञांचे मार्गदर्शन खूप महत्त्वाचे असते.

हेही वाचा >>>अर्थसंकल्प २०२३ : ‘खर्च करा अन् सरकारची करझोळी भरा’

बचत / गुंतवणुकीची रक्कम निश्चित करणे – भविष्यातील आवश्यक रक्कम निश्चित केल्यावर पुढील टप्पा असतो उपलब्ध कालावधीनुसार बचत / गुंतवणुकीचा पर्याय निवडणे आणि गुंतवणुकीची रक्कम निश्चित करणे.वरील उदाहरणात सारिकाच्या लग्नाला १९ वर्षांचा अवकाश आहे. साहजिकच आपण समभागसंलग्न अर्थात इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे अधिक योग्य ठरेल .

वरील उदाहरणात, सारिकाच्या लग्नासाठी पुढील १९ वर्षात ९०.४१ लाख रुपयांची तरतूद करायची आहे. यासाठी दरमहा करायची गुंतवणूक आपण निश्चित केली पाहिजे. येथे भविष्यातील आवश्यक रक्कम ९०.४१ लाख रुपये आहे. कालावधी १९ वर्ष म्हणजेच २२८ महिने आणि गुंतवणूक वाढीचा अंदाजित दर वार्षिक १२ टक्के आहे. या माहितीच्या मदतीने आपण दरमहा करायची गुंतवणूक निश्चित करूया .
दरमहा १०,३२८ रुपयांची गुंतवणूक केली तर आपण आपले उद्दिष्ट पूर्ण करू शकतो.

( नोंद – वरील उदाहरणामध्ये आपण समभागसंलग्न अर्थात इक्विटी म्युच्युअल फंडाच्या परताव्यात वाढ वार्षिक १२ टक्क्यांंप्रमाणे होईल या गृहीतकाच्या आधारे गुंतवणुकीचा पर्याय निश्चित केला आहे.)

भविष्यातील विविध आर्थिक उद्दिष्टांसाठी याप्रकारे आपण आवश्यक निधी आणि आवश्यक बचतीची / गुंतवणुकीची रक्कम निश्चित करूया.
आर्थिक उद्दिष्ट आवश्यक रक्कम उपलब्ध कालावधी भविष्यातील आवश्यक बचत / गुंतवणुकीचा दरमहा करायची
(आजच्या प्रमाणे ) ( वर्ष ) रक्कम पर्याय बचत / गुंतवणूक (रु.)

कार ८ लाख २ वर्ष ९.१६ लाख बँक रिकरिंग डिपॉझिट ३६,०००
पर्यटन ५ लाख ५ वर्ष ७.०१ लाख हायब्रीड म्युच्युअल फंड ९,२००

सारिकाचे
उच्च शिक्षण २५ लाख १३ वर्ष ६०.२५ लाख इक्विटी म्युच्युअल फंड १६,०००
सारिकाचे लग्न २५ लाख १९ वर्ष ९०.४१ लाख इक्विटी म्युच्युअल फंड १०.४००

सेवानिवृत्तीचे
नियोजन दरमहा ५०,००० २८ वर्ष ९.६१ कोटी इक्विटी म्युच्युअल फंड ३९,५००

गृहीतक – महागाई वाढीचा दर – ७%
बँक रिकरिंग डिपॉजिट व्याजदर – ६%

हायब्रीड म्युच्युअल फंड परतावा दर – ९ %
इक्विटी म्युच्युअल फंड परतावा दर – १२ %

हेही वाचा >>>Gold-Silver Price on 5 February 2023: आनंदवार्ता! सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे आपण आपल्या विविध आर्थिक उद्दिष्टांसाठी आवश्यक बचत / गुंतवणुकीची रक्कम जाणून घ्यायची आहे.
सर्वप्रथम प्राधान्यक्रम नक्की करणे. वरील उदाहरणामधील प्राधान्यक्रमानुसार दरमहा करायची बचत आणि गुंतवणुकीची एकत्रित रक्कम : ३६,००० ९,२०० १६,००० १०,४०० ३९,५०० = १,११,००० रुपये.

साहजिकच सर्वांना दरमहा इतक्या रकमेची गुंतवणूक शक्य होणार नाही. जर सर्व उद्दिष्टांसाठी लगेचच गुंतवणूक शक्य नसेल तर सर्वोच्च प्राधान्यक्रम निश्चित करावेत. जास्त महत्त्वाच्या उद्दिष्टांसाठी गुंतवणुकीला प्रारंभ करावा आणि भविष्यात उत्पन्नांत वाढ झाल्यावर इतर उद्दिष्टांसाठी गुंतवणुकीला प्रारंभ करावा. त्याचप्रमाणे ‘एसआयपी टॉप-अप’ यासारख्या सुविधांचा देखील लाभ घ्यावा. प्राधान्यक्रम निश्चित करण्यासाठी बचत / गुंतवणुकीचे पर्याय नक्की करण्यासाठी आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

महत्त्वाचे – स्मार्ट पद्धतीने आर्थिक उद्दिष्ट लिहून आर्थिक तज्ज्ञाच्या मदतीने नियोजन केल्यास तुम्ही तुमची विविध आर्थिक उद्दिष्टे योग्यप्रकारे साध्य करू शकाल.

लेखक पुणेस्थित गुंतवणूक सल्लागार

dgdinvestment@gmail.com